Manoj Jarange : मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक अंदोलन केली. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत होते. पण आता ते चर्चेत आहेत ते एका वेगळ्या कारणामुळे आरक्षणासाठी लढा देणारे मनोज यांना जीवे मारण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना या संभंधित ताब्यात घेतले असून, त्यांची नावे अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आहेत. विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून काही धक्कादायक खुलासे झाले आहेत, मिळालेल्या माहितीनुसार परळीतील एका नेत्याने काही कोटी रुपयांची सुपारी देत जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता त्या दोघांची हि कसून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या ह्या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान, जरांगे यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांना देखील अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मागच्या काही काळापासून मराठा आरक्षण जोरदार गाजत होत. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला असताना, आता त्यांना जीवे मारण्याचा कट उघडकीस आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार नक्की कोण आहे याचा सखोल तपास सुरु केला आहे.
हे देखील वाचा –









