Home / महाराष्ट्र / Minister Chandrakant Patil : मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात

Minister Chandrakant Patil : मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात

Minister Chandrakant Patil

Minister Chandrakant Patil : मराठा समाज (Maratha community) हा मागासलेला (backward)नाही. त्याला कधीही अस्पृश्यांसारखी वागणूक मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळणे शक्य नाही. ते दिले गेले तरी पुढे कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. हे आंदोलन राजकीय असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे विधान राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj jarange patil) यांनी आजच तीव्र शब्दात समाचार घेतला.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले, की मराठा समाज हा मागासलेला नसल्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण (OBC quota) मिळण्यात अडचणी आहेत. एखाद्या समाजाला मागासले ठरवण्याचा अधिकार हा केवळ मागासवर्गीय आयोगाला (Backward Classes Commission)आहे. तो शिंदे समितीला नाही. तामिळनाडूप्रमाणे हे आरक्षणही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते. कुणबी दाखले मिळाले तरी ते सिद्ध करता आले पाहिजेत. तोडगा निघणार असेल तर मला मनोज जरांगेंना भेटायला काही हरकत नाही. मात्र जरांगेंनी मुंबईकरांना वेठीस धरु नये.

चंद्रकांत पाटलांच्या या विधानाचा जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की हे तेच चंद्रकांत पाटील आहेत, ज्यांनी मराठा समाजाची जात पडताळणी रोखली होती. त्यांनी या विषयावर अधिक बोलू नये. मी त्यांच्याविषयी बोलायला लागलो तर मग त्यांना समजेल खरे काय आहे ते. त्यामुळे त्यांनी या प्रश्नात न बोलणेच बरे आहे. चंद्रकांत पाटील यांना काही अक्कल नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रमुखपदावरून काढून टाकण्यात आले आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका

मराठा आंदोलकांसाठी ठाकरे सेनेकडून जेवण