FIR Against Congress : काँग्रेसतर्फे (Congress) मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी (I Run to Stop Vote Theft) या उपक्रमाअंतर्गत बुलडाणा (Buldhana)येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरात बॅनर लावण्यात आले होते. मात्र, या प्रकरणावरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांच्यासह २३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध चिखली पोलिसांनी (Chikhli Police)गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईमुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची भेट घेऊन रोष व्यक्त केला. ही कारवाई चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते शैलेश गोंधने यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली.
शैलेश गोंधने यांनी आरोप केला, की ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चिखली शहरात ६५ ठिकाणी फलक लावले होते. त्यासाठी नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेतली होती. या फलकांवर थोडे धावा शेतकऱ्यांचे १०० कोटी जमा करण्यासाठी असा मजकूर होता, मात्र कोणाचेही नाव न टाकता हे फलक लावण्यात आले होते. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनधिकृत जमाव जमवून विद्यूत खांबावर चढून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. त्याचबरोबर, त्यांनी स्वतः लावलेले फलक फाडून जाळण्यात आल्याचेही नमूद केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय
आमच्यात घुसून षडयंत्र ; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन