Home / महाराष्ट्र / Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

Margashirsha Guruvar 2025 : मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

Margashirsha Guruvar 2025 : भारतीयांचे सण वर्षभर सुरूच असतात आणि सण म्हटलं कि एक वेगळ्याच प्रकारचा उत्सह देखील पाहायला मिळतो....

By: Team Navakal
Margashirsha Guruvar 2025
Social + WhatsApp CTA

Margashirsha Guruvar 2025 : भारतीयांचे सण वर्षभर सुरूच असतात आणि सण म्हटलं कि एक वेगळ्याच प्रकारचा उत्सह देखील पाहायला मिळतो. आणि त्यातीलच एक पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्षचा महिना. आज पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरवात झाली आहे. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना असतो. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित केले जातात. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच जास्त महत्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत देखील केले जातात. पुराणानुसार, या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि सुख- समृद्धी प्राप्त होते. यासाठी या महिन्यात दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा केली जाते.या महिन्यात ४ मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जातील.

मार्गशीर्षमधल्या गुरुवारचे विशेष महत्त्व (Margashirsha First Guruvar)

आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे आणि समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कथेचे पठण देखील केले जाते, आणि ते पठण मार्गशीर्षमधल्या गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी देवीचा मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजा केली जाते.

मार्गशीर्षातल्या गुरुवारची पूजा कशी करावी ? (Margashirsha Guruvar Puja Vidhi)

मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी घट मांडणारी जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग अथवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ आणि वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी ह्या कलशाच्या आत ठेवावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करावी, आणि चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र देखील ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ हे पदार्थ ठेवा. यानंतर विधीवत पूजा करा, आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवून देवीची पूजा करू शकता.

हे देखील वाचा –

Malegaon Rape and Murder Case : मालेगाव अत्याचार प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट; नागरिकांचा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिखित आहे. या माहितीतही पुष्टी आम्ही करत नाही.)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या