Mega Block : मध्य रेल्वेने शुक्रवारी मुंबई लोकल ट्रेनचे वेळापत्रक शेअर करताना सांगितले की, रविवारी त्यांच्या ट्रान्स-हार्बर आणि मुख्य मार्गिकेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून २६ ऑक्टोबर रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
सीएसएमटी मुंबईहून १०.३६ ते १५.१० तासांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ तासांपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबल्या जातील, माटुंगा स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ब्लॉक कालावधीत वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ पर्यंत वाशी/नेरूळ/पनवेल येथे जाणारी डाऊन लाईन सेवा आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून जाणारी डाऊन लाईन सेवा १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत रद्द राहतील. “पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा मेगा ब्लॉक आवश्यक आहे.
हे देखील वाचा –Marathi Language Viral Video : विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..









