Home / महाराष्ट्र / MNS 20th Foundation Day: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन! राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले…

MNS 20th Foundation Day: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन! राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले…

MNS 20th Foundation Day: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन आज रायगडाच्या पावन भूमीवर साजरा केला जात आहे. या...

By: Team Navakal
MNS
Social + WhatsApp CTA

MNS 20th Foundation Day: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन आज रायगडाच्या पावन भूमीवर साजरा केला जात आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

दोन दशकांच्या या खडतर प्रवासात मराठी अस्मिता आणि राज्याच्या विकासासाठी पक्षाने दिलेले योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे नमूद केले.

२० वर्षांचा प्रवास: संघर्ष आणि ओळख

पक्षाच्या स्थापनेमागचा मूळ हेतू मराठी माणूस, मराठी भाषा आणि राज्याचा सर्वांगीण विकास हाच होता. आज मागे वळून पाहताना राज ठाकरे म्हणाले की, आपण अनेक आंदोलने केली, निवडणुका लढवल्या आणि चढ-उतार पाहिले.

मात्र, ‘मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हे समीकरण लोकांच्या मनात घट्ट बसवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आजही कुठेही मराठी माणसावर अन्याय झाल्यास, ‘मनसे कुठे आहे?’ असा प्रश्न विचारला जाणे, हीच आपली सर्वात मोठी कमाई असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

चौथी औद्योगिक क्रांती आणि तरुणांचे स्वप्न

गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रात मोठी पिढी बदलली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळी जे लहान होते, ते आज मतदार झाले आहेत. सध्या जग ‘चौथ्या औद्योगिक क्रांती’च्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील तरुणांमध्ये जगाला गवसणी घालण्याची जिद्द आहे. ही क्रांती आपल्या भाषेत आणि आपल्या राज्यात घडावी, हे आपले ध्येय आहे. ज्यांना उत्तम आयुष्याची ओढ आहे आणि कष्ट करण्याची तयारी आहे, अशा तरुणांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा गौरवशाली भूतकाळ भविष्यात परत आणला पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

नव्या सदस्य नोंदणीची सुरुवात

वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्या, १० मार्च २०२६ पासून मनसेतर्फे विशेष सदस्य नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील तरुण-तरुणींना आवाहन केले आहे की, आपली जात, धर्म किंवा राजकीय विचारधारा बाजूला ठेवून केवळ ‘महाराष्ट्र वेडाने झपाटलेले’ आहात, हेच महत्त्वाचे आहे. पक्षात सदस्य होणे म्हणजे केवळ ‘महाराष्ट्र सैनिक’ होणे नसून, ते ‘महाराष्ट्राचे पाईक’ होण्यासारखे आहे.

इच्छुक तरुण पक्षात सक्रिय सभासद म्हणूनही काम करू शकतात, त्यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये तसा पर्याय देण्यात आला आहे.

एक नवा आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी या चळवळीत सहभागी व्हा, अशी साद राज ठाकरे यांनी रायगडावरून घातली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या