Home / महाराष्ट्र / MNS Candidate List: राज ठाकरेंचा ‘ठाणे प्लॅन’ तयार! मनसेच्या 28 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

MNS Candidate List: राज ठाकरेंचा ‘ठाणे प्लॅन’ तयार! मनसेच्या 28 उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

MNS Candidate List Thane 2025 : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या अधिकृत...

By: Team Navakal
MNS Candidate List Thane 2025
Social + WhatsApp CTA

MNS Candidate List Thane 2025 : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ठाण्यात मनसे एकूण 28 जागा लढवत असून जुन्या जाणत्यांसह नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

मनसेची ठाण्यातील 28 उमेदवारांची संपूर्ण यादी:

मनसेकडून एबी फॉर्म मिळालेल्या आणि रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे प्रभागानुसार खालीलप्रमाणे आहेत:

प्रभाग क्रमांकउमेदवार
प्रभाग 2 (ड)रवींद्र मोरे
प्रभाग 3 (क)निलेश चव्हाण
प्रभाग 4 (अ)प्रतिक्षा हरेश्वर डाकी
प्रभाग 5 (ड)पुष्कराज विचारे
प्रभाग 7 (ब)स्वप्नाली खामकर-पाचंगे
प्रभाग 8 (ड)सचिन कुरेल
प्रभाग 11 (क)सीमा इंगळे
प्रभाग 12 (अ)रूपेश जाधव
प्रभाग 12 (ब)रक्षा मांडवकर
प्रभाग 14 (अ)रेश्मा चौधरी
प्रभाग 15 (अ)पवनकुमार पडवळ
प्रभाग 16 (ब)आरती पाटील
प्रभाग 16 (क)रश्मी सावंत
प्रभाग 17 (ब)पूजा ढमाळ
प्रभाग 18 (क)प्राची घाडगे
प्रभाग 19 (ब)प्रमिला मोरे
प्रभाग 20 (ब)सविता मनोहर चव्हाण
प्रभाग 20 (क)राजश्री नाईक
प्रभाग 21 (ब)संजीता जोशी
प्रभाग 21 (क)उर्मिला डोंगरे
प्रभाग 22 (अ)प्रज्ञा कांबळे
प्रभाग 22 (ब)रवींद्र सोनार
प्रभाग 27 (अ)प्रकाश दत्ता पाटील
प्रभाग 27 (ब)नीता देवेंद्र भगत
प्रभाग 27 (क)मयूरी तेजस पोरजी
प्रभाग 27 (ड)प्रशांत प्रभाकर गावडे
प्रभाग 28 (ब)रेश्मा नरेश पवार
प्रभाग 28 (क)अंकिता अनंत कदम

ठाण्याचे राजकीय समीकरण

ठाणे महानगरपालिकेत एकूण 47 वॉर्ड असून 131 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेना (यूबीटी) सर्वाधिक जागा लढवत आहे, तर मनसे 28 जागांवर आपले नशीब आजमावत आहे. दुसरीकडे, काँग्रेसला समाधानकारक जागा न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यात महायुती, महाविकास आघाडी आणि काँग्रेस अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच युतीत आल्याने ठाण्यातील ‘मराठी माणूस’ कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 11 जानेवारीपासून या निवडणुकीचा प्रचार अधिक वेगवान होणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या