Home / महाराष्ट्र / मराठीविरोधी वक्तव्य प्रकरणी खा. दुबेंना मनसेकडून नोटीस

मराठीविरोधी वक्तव्य प्रकरणी खा. दुबेंना मनसेकडून नोटीस

मुंबई – मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील गोड्डाचे भाजपा खासदार निशिकांत दुबे (BJP MP from Godda Nishikant Dubey,...

By: Team Navakal
Nishikant Dubey

मुंबई – मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील गोड्डाचे भाजपा खासदार निशिकांत दुबे (BJP MP from Godda Nishikant Dubey, f)यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस (legal notice) पाठवली आहे. ही नोटीस मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे (MNS’s Sudam Kombde)यांनी वकील मनोज सुरेश पिंगळे यांच्यामार्फत पाठवली.

निशिकांत दुबेने माफी मागावी आणि समाज माध्यमांवर व्हायरल केलेले सगळे व्हिडिओ तातडीने हटवण्यात यावे अशी मागणी या नोटीसमधून करण्यात आली. या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ७ जुलै २०२५ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना दुबे यांनी मराठी भाषिकांविरोधात अपमानजनक विधाने केली. ही विधाने समाज माध्यम आणि वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली. दुबे यांनी केलेली वक्तव्ये मराठी माणसाच्या भावना दुखावणारी आणि आक्षेपार्ह आहेत. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिक नागरिकांची सार्वजनिकपणे लेखी माफी (apologize) मागावी. मागणी वेळेत पूर्ण न केल्यास ७ दिवसांत कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title:
संबंधित बातम्या