Home / महाराष्ट्र / ‘नव्या भिडूची गरज नाही’; मनसेसोबतच्या आघाडीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मांडली भूमिका

‘नव्या भिडूची गरज नाही’; मनसेसोबतच्या आघाडीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मांडली भूमिका

MNS MVA Alliance: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये...

By: Team Navakal
MNS MVA Alliance

MNS MVA Alliance: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महाविकास आघाडीमध्ये (MVA) समाविष्ट करून घेण्यावरून घटक पक्षांमध्ये मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मनसेला आघाडीत घेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युतीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट नकार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला ‘नव्या भिडूची’ आवश्यकता नाही. त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी स्थानिक पातळीवर, म्हणजेच जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या निर्णयानुसार होतील.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात युतीच्या सुरू असलेल्या चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनसेची सडेतोड प्रतिक्रिया

काँग्रेसच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, युतीसाठी मनसेकडून कोणीही काँग्रेसकडे गेले नव्हते. सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत, त्यास राजकीय स्वरूप आलेले नाही.

मनसेचा कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार फक्त अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Decision) यांनाच आहे आणि आम्ही महाराष्ट्रसैनिक म्हणून त्यांच्या आदेशाचे पालन करू, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाची मवाळ भूमिका

काँग्रेसच्या विरोधानंतरही ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर ृयांनी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस हा स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

सपकाळ यांच्या वक्तव्याचा अर्थ स्थानिक पातळीवरील निर्णयावर सोडलेला आहे. त्यामुळे ठाणे, पुणे यांसारख्या काही महत्त्वाच्या विभागात युतीसाठी काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली यासारख्या महापालिकांमध्ये मराठी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी मनसेसोबत युतीचा प्रयत्न करण्याची ठाकरे गटाची भूमिका आहे.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेव्हा चर्चेला बसतील, तेव्हा या सर्व विषयांवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अहिर यांनी नमूद केले.

हे देखील वाचा – दिवाळीपूर्वी महावितरणचा झटका! वीज बिलात होणार मोठी वाढ; नवीन दर पहा

Web Title:
संबंधित बातम्या