MNS Presentation : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील घोळ आणि बोगस मतदानाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यापाठोपाठ मुंबईत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनीही वरळीतील मतदार यादीतील घोळाचे सादरीकरण केले. आता उद्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेही (Raj Thackeray) मतदान घोळावर सादरीकरण करणार आहेत.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात (Rangsharda Auditorium) उद्या संध्याकाळी ५ वाजता मनसेचा (Maharashtra Navnirman Sena) हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व मनसे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मतदार यादीतील गोंधळ, बोगस नावे, तसेच निवडणुकीदरम्यान होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांवर चर्चा होणार आहे. याशिवाय आगामी निवडणुकीत (Elections) बोगस मतदान रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी आणि संघटनात्मक तयारी याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसेने मुंबईतील मतदार यादीतील विसंगती आणि बोगस नावे या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.
हे देखील वाचा –
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करा; जैन समाजाचा एकदिवसीय उपवास
दोन-चार मंत्र्यांना कापा ; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान









