Home / महाराष्ट्र / नाशिकमध्ये १२ सप्टेंबरला मनसे-उबाठा संयुक्त मोर्चा

नाशिकमध्ये १२ सप्टेंबरला मनसे-उबाठा संयुक्त मोर्चा

नाशिक – नाशिकमध्ये आज मनसे (MNS) आणि उबाठा (UBT) पक्षाची बैठक पार पडली. शहर व जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्यांवर तोडगा...

By: Team Navakal
MNS-UBT March

नाशिक – नाशिकमध्ये आज मनसे (MNS) आणि उबाठा (UBT) पक्षाची बैठक पार पडली. शहर व जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या १२ सप्टेंबर रोजी मनसे आणि उबाठा पक्षाचा संयुक्त मोर्चा(march) काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या मोर्चासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे(Raj Thackeray) यांनाही औपचारिक निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असताना हा मोर्चा दोन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ ठरणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि इतर स्थानिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा या मोर्चाचा उद्देश आहे. संयुक्त बैठकीत मोर्चाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, मनसे व उबाठा पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या