मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात मोबाईल टॉवरच्या (Mobile tower) माध्यमातून नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या एकूण ११ दूरसंचार कंपन्यांनी मिळून तब्बल ९३ कोटी ८६ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve)अंबादास दानवे यांनी दिली.
दानवे पुढे म्हणाले की, या कंपन्यांमध्ये २१ फर्स्ट सेंचुरी इन्फर्टल लि. कंपनीचा ७५ लाख, एटीसी टॉवर कॉर्पोरेशन प्रा.लि. कंपनीचा ८३ लाख, भारत सेल्युलर लि. कंपनीचा ८ कोटी ९६ लाख, बीपीएल मोबाइल कम्युनिकेशन कंपनीचा ३ कोटी ३७ लाख, आयडिया सेल्युलर लि. कंपनीचा ३ कोटी ३७ लाख, इंडस टॉवर्स लि. कंपनीचा ३५ कोटी ६९ लाख, महानगर टेलिफोन निगम लि. कंपनीचा ५ कोटी १२ लाख, रिलायन्स इन्फोकॉम लि. कंपनीचा ११ कोटी ९८ लाख, टाटा टेली सर्व्हिस (महाराष्ट्र) लि. कंपनीचा ३ कोटी २४ लाख, व्होडाफोन एस्सार लि. कंपनीचा ३ कोटी १५ लाख आणि अन्य कंपनीचा १७ कोटी ९ लाखांचा मालमत्ता कर थकित आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून मालमत्ता कर न भरणाऱ्या कंपन्यांच्या मोबाईल टॉवरवर कारवाई करण्यात आली आहे का? तसेच त्यांच्यावर टॉवर परवानग्या रद्द करण्याची कारवाई सुरू आहे का, याबाबत माहिती मागवली असता अद्याप शासनाकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही.
यासंदर्भात उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यापैकी बीपीएल मोबाइल कम्युनिकेशन कंपनीचा ३ कोटी ७४ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. त्यांच्यावर दरमहा २ टक्के दराने दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली आहे.