Nagpur winter session – नागपुरात ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन (Nagpur winter session) सुरु होत आहे. या अधिवेशनात विविध मागण्यांसाठी ३३ हून अधिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. यामध्ये २२ संघटनांनी धरणे आंदोलन, तर १७ संघटनांनी साखळी उपोषण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाच मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समिती यांच्या मोर्चांकडे विशेष लक्ष आहे.
मोर्चांच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी ७ हजार पोलीस तैनात, पाच आधुनिक दक्षता वाहने, विशेष कमांडो आणि गृहरक्षक दलाची नियुक्ती करण्यात येत आहे. दरम्यान राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली आहे. अविनाश ढाकणे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तर अतुल पाटणे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे.









