MPSC Group C Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या जाहिरातीद्वारे विविध विभागांमधील 938 पदांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 7 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून, परीक्षेची तारीख 4 जानेवारी 2026 आहे.
MPSC Group C Exam: भरली जाणारी पदे (सेवा संवर्ग):
एमपीएससीकडून या संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे खालील चार संवर्गांतील पदांसाठी भरती केली जाईल:
- लिपिक टंकलेखक (Clerk Typist): सर्वाधिक 852 जागा
- कर सहायक (Tax Assistant): 73 जागा
- उद्योग निरीक्षक (Industry Inspector): 9 जागा
- तांत्रिक सहायक (Technical Assistant): 4 जागा
अर्जाची अंतिम मुदत आणि शुल्क:
अर्ज करण्याची मुदत | 7 ऑक्टोबर (दुपारी 1.00 वाजल्यापासून) ते 27 ऑक्टोबर (रात्री 23.59 पर्यंत) |
ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 27 ऑक्टोबर (रात्री 23.59 पर्यंत) |
चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख (शाखा) | 30 ऑक्टोबर (कार्यालयीन वेळेत) |
परीक्षेचे शुल्क (पूर्व परीक्षा):
प्रवर्ग | शुल्क |
खुला प्रवर्ग | 394 रुपये |
मागासवर्गीय, EWS, अनाथ | 294 रुपये |
माजी सैनिक | 44 रुपये |
पात्रता आणि परीक्षा स्वरूप:
- शैक्षणिक पात्रता: उद्योग निरीक्षक वगळता इतर सर्व संवर्गांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान किंवा विज्ञान शाखेची पदवी/पदविका आवश्यक आहे.
- परीक्षेचे टप्पे: ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होईल: संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुण) आणि त्यानंतर मुख्य परीक्षा (400 गुण).
- कौशल्य चाचणी: लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) द्यावी लागेल.
हे देखील वाचा – दिवाळीपूर्वी महावितरणचा झटका! वीज बिलात होणार मोठी वाढ; नवीन दर पहा