MPSC Group C Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Exam) २०२५’ ची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे महाराष्ट्र (Maharashtra) शासनाच्या विविध विभागांतील ९३८ रिक्त पदे देखिल भरली जाणार आहेत. ही परीक्षा (MPSC Exam) रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर हि परीक्षा होईल. अर्ज प्रक्रियेला मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार.
या भरतीमध्ये उद्योग निरीक्षकासाठी ९ पदे शिवाय, वेतनश्रेणी एस-१३ (रु. ३५,४००-१,१२,४००) आहेत. तांत्रिक सहाय्यकासाठी ४ पदे आहेत, वेतनश्रेणी एस-१० (रु. २९,२००-९२,३००) आहे. वित्त विभागातील कर सहाय्यकासाठी ऐकून ७३ पदे असून, वेतनश्रेणी एस-८ (रु. २५,५००-८१,१००) आहे. सर्वाधिक ८५२ पदे लिपिक-टंकलेखकासाठी आहेत, वेतनश्रेणी एस-६ (रु. १९,९००-६३,२००) आहे. या भरतीद्वारे एकूण ९३८ जागा भरल्या जाणार.
या परीक्षेची तयारी करताना उमेदवारांना या परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत माहित असणे गरजेचे आहे.या परीक्षेत पूर्व आणि मु्ख्य परीक्षा असे दोन महत्त्वाचे टप्पे असतील. त्यामध्ये पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाचा मुख्य परीक्षा देता येणार आहे.
पूर्व परीक्षा १०० गुणांची आहे. यात १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे. प्रश्नांची काठीण्य पातळी पदवीधर स्तराचीच असेल. हि परीक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि बहुपर्यायीसुद्धा असेल. चुकीच्या उत्तरांसाठी २५% म्हणजेच १/४ गुण (negative marking) कापले जातील. एकापेक्षा जास्त उत्तरे दिल्यास किंवा उत्तर पूर्ण न भरल्यास ते उत्तर चुकीचे देखील मानले जाईल. अनुत्तरित प्रश्नांसाठी गुण कापले जाणार नाहीत.
पूर्व परीक्षेतील अभ्यासक्रमात अभियोग्यता चाचणीचा देखील समावेश आहे. यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, लोकवित्त, चालू घडामोडी, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान या विषयांचा समावेश आहे. तसेच, उमेदवारांची विचार करण्याची गती आणि अचूकता तपासण्यासाठी मानसिक क्षमता चाचणी देखील घेतली जाईल.
हे देखील वाचा –