Home / महाराष्ट्र / मुंबईत १६ जूनपासून आशा सेविकांचे आंदोलन

मुंबईत १६ जूनपासून आशा सेविकांचे आंदोलन

मुंबई – मुंबईत सोमवार १६ जूनपासून महापालिकेच्या आशा सेविका (Asha workers) प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन (Protest) करणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री...

By: Team Navakal
Asha Worker Protest

मुंबई – मुंबईत सोमवार १६ जूनपासून महापालिकेच्या आशा सेविका (Asha workers) प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन (Protest) करणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आशा सेविकांनी ४५ दिवस आंदोलन केले होते. त्यावेळी शिंदे सरकारने मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते पण अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत असा आरोप आशा सेविकांनी केला आहे.


२९ जुलै २०२४ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मणी अशा सेविकांनी केली आहे. किमान वेतन लागू करणे, दर महिन्याच्या १ तारखेला पगार (Salary) देणे, सेवानिवृत्त (Retired) आरोग्यसेविकांच्या जागी आशा सेविकांची नियुक्ती, ओळखपत्र (Identity card,), नियुक्तीपत्र (Appointment letter) आणि stationery व अप्रॉन उपलब्ध करून देणे यांसारख्या मागण्या लावून धरल्या आहेत. कोणत्याही अतिरिक्त कामासाठी खास मानधनाविना आदेश लादू नयेत, या मागणीचाही समावेश आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सेविकांनी व्यक्त केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या