Home / महाराष्ट्र / Mumbai Water Crisis: मुंबईकरांवर दुहेरी संकट! पालिकेच्या पाणी कपातीनंतर आता प्रायव्हेट टँकरही बंद होणार? ‘या’ दिवसापासून सेवा ठप्प

Mumbai Water Crisis: मुंबईकरांवर दुहेरी संकट! पालिकेच्या पाणी कपातीनंतर आता प्रायव्हेट टँकरही बंद होणार? ‘या’ दिवसापासून सेवा ठप्प

Mumbai Water Crisis: उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मुंबईकरांना आता पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील...

By: Team Navakal
Mumbai Water Crisis: मुंबईकरांवर दुहेरी संकट! पालिकेच्या पाणी कपातीनंतर आता प्रायव्हेट टँकरही बंद होणार? 'या' दिवसापासून सेवा ठप्प
Social + WhatsApp CTA

Mumbai Water Crisis: उन्हाळ्याच्या उत्तरार्धात मुंबईकरांना आता पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ४० दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिल्याने, मुंबई महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू केली आहे.

या पाणी कपातीमुळे मुंबईकर आधीच त्रस्त असताना, आता त्यांच्या अडचणीत आणखी मोठी भर पडली आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने येत्या रविवारी रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण मुंबईत टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईकरांवर पाण्याचे मोठे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

Mumbai Water Crisis: टँकर चालकांच्या संपामागचे मुख्य कारण काय?

खाजगी टँकर असोसिएशनने अचानक घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमागे केंद्र सरकारच्या नियमावलीचा वाद आहे:

  • केंद्रीय प्राधिकरणाचे कडक नियम: केंद्रीय भूजल प्राधिकरणाने जमिनीतील पाणी उपशासंदर्भात (ग्राउंड वॉटर) काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे टँकर चालकांसमोर अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्याचा असोसिएशनचा दावा आहे.
  • मुख्यमंत्र्यांकडे धाव: या जाचक नियमांना विरोध करत टँकर चालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुमेत्रा पवार आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.
  • तोडगा निघेपर्यंत सेवा बंद: जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यंत मुंबईत एकही खाजगी टँकर धावणार नाही, असा स्पष्ट इशारा असोसिएशनने दिला आहे.

Mumbai Water Crisis: हॉस्पिटल्स आणि गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा फटका बसणार

मुंबईतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा पाहता हा संप सर्वसामान्यांची कोंडी करणारा ठरू शकतो. मुंबईतील हजारो मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, व्यावसायिक इमारती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक मोठी हॉस्पिटल्स दैनंदिन गरजेसाठी पूर्णपणे या खाजगी वॉटर टँकरवर अवलंबून असतात.

महानगरपालिकेच्या १० टक्के कपातीमुळे आधीच पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जर खाजगी टँकर पुरवठाही पूर्णपणे ठप्प झाला, तर मुंबईत पाहाता पाहाता हाहाकार माजू शकतो. आता या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासन टँकर चालकांसोबत काय चर्चा करते आणि यातून काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – CJP Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कार्यकर्त्यांना नियमावली

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या