Mumbai Crime : महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी आणि बिल्डर्स लॉबी वाढत असून बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधिंची उलाढाल गुन्हेगारीला प्रवृत्त करताना दिसून येत आहे. त्यातून, धमक्या, खून, अपहरणासारखे मोठे आणि अतिशय गंभीर गुन्हे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या (Firing) झाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात भरदिवसा हा गोळीबार करण्यात आला. अज्ञाताकडून विकासकावर (Builder) २ ते ३ राऊंड फायर करण्यात आले आहेत.आणि या गोळीबारात विकासक गंभीर जखमी झाला आहे.
या गोळीबारात विकासकाच्या पोटात दोन गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून पळून गेले. जखमी तरुणाला तात्काळ बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वेगवेगळ्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीला शोधात आहेत. याशिवाय,फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, मुंबई सारख्या शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात, एकच खळबळ माजली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कांदिवली-चारकोपमध्ये गुंडांचा जास्तच सुळसुळाट असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे शिवाय मनसेने पोलिसांना थेट अल्टिमेटम दिला आहे. कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरण आता रोजचच झाल आहे. या आधी नवरात्रीत घडलेली एक घटना या सालगच्या घडणाऱ्या घटनांनी नागरिकांना धास्तावून टाकले आहे. चारकोपला बिहार बनवू देणार नाही,” असे म्हणत मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.
हे देखील वाचा – Nitish Kumar : अखेर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला! नितीश कुमार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ









