कबुतरांच्या विष्ठेचा धोका, मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश

BMC ordered to shutdown 'kabootar khanas' in Mumbai

BMC ordered to shutdown ‘kabootar khanas’ in Mumbai | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मुंबईतील कबूतरखान्यांमुळे (Kabootar Khanas) होणारे आरोग्य धोके लक्षात घेऊन त्यांना तातडीने बंद करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) दिले आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेतशिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होत असल्याने ही ठिकाणे धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे मुंबईतील 51 कबूतरखान्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

कबूतरखान्यांचे आरोग्य धोके

मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत सांगितले की, कबुतरखान्यांमुळे आसपासच्या रहिवाशांना श्वसनाचे आजारहोत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही याला पाठिंबा देत, कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या मावशीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कबुतरांना खाद्य देण्याच्या ठिकाणी पिझ्झा आणि बर्गरसारखे पदार्थ खाण्याची सवय लागल्याने त्यांच्यामुळे रोगांचा धोका वाढला आहे, असे बीएमसीच्या (BMC) तपासात आढळले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांनी सांगितले की, मुंबईत 51 कबूतरखाने असून, त्यांच्याविरोधात एका महिन्यात जनजागृती मोहीम सुरू होईल. बीएमसीला (BMC) ही ठिकाणे तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सांताक्रूझ आणि दौलत नगर येथील अनधिकृत कबूतरखाने बंद करून तिथे ट्रॅफिक आयलंड आणि मियावाकी गार्डन्स उभारण्यात आली आहेत. दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना दोन दिवस बंद राहिल्यावर पुन्हा सुरू झाला, कारण स्थानिकांनी पुन्हा खाद्य देणे सुरू केले.

उदय सामंत यांनी कबुतरांना खाद्य देण्याच्या धोक्यांबाबत जनजागृतीची गरज असल्याचे अधोरेखित केले. बीएमसी (BMC) आता याबाबत जागरूकता मोहिम राबवणार आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे होणारे श्वसनाचे आजार टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.