Home / महाराष्ट्र / Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो ३ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..

Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो ३ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..

Mumbai Metro 3 : नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो ३ला (Metro) प्रवाशांची चांगलीच पसंती पाहायला मिळाली आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील (Mumbai)...

By: Team Navakal
Mumbai Metro 3

Mumbai Metro 3 : नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रो ३ला (Metro) प्रवाशांची चांगलीच पसंती पाहायला मिळाली आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील (Mumbai) कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआरपर्यंत पूर्णपणे मेट्रो कार्यरत झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण जेव्हा पासून हि मेट्रो (Metro)सेवा सुरु झाली आहे तेव्हा पासून तिकीट काढण्यासाठीचे प्रवाशांचे हाल मात्र कायम आहेत. पण यावर मुंबई मेट्रो प्रशासनाने महत्वाचा तोडगा काढला आहे.

मोफत वायफाय सुविधा उपलब्ध

गेल्या काही काळापासून मेट्रो मार्गावर मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवली आहे. या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर महत्त्वपूर्ण असा तोडगा काढला आहे. आता मेट्रो-३ मार्गिकेतील सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे. मेट्रो-३ मार्गिका ही पूर्णपणे भूमिगत असल्यामुळे मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये सुरळीत काम करत नव्हते. यामुळे प्रवाशांना विशेषतः ई-तिकीट (E-ticket) काढताना मोठ्या गैरसोइला सामोरे जावे लागत होते. तसेच अनेक तांत्रिक अडचणी देखील येत होत्या. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन एमएमआरसीने यावर मोफत वायफाय सुविधेचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे.

प्रवासाची गैरसोय थांबणार-
या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी Metro Connect 3 ॲपद्वारे लॉगिन करून अगदी सहजरित्या आणि जलद गतीने ई-तिकीट काढता येणार आहे. ज्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल आणि तिकीट काढताना होणारी अडचण दूर होईल.मेट्रो ३च्या उद्घाटनामुळे ही संपूर्ण मार्गिका आता पूर्ण क्षमतेने धावत आहे. ही संपूर्ण मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतील वाहतुकीचे मेट्रोचे महत्त्वपूर्ण जाळे पूर्ण झाले आहे. या मेट्रो-३ ने दररोज जवळपास दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन एमएमआरसीए मार्फत हे अत्यंत महत्वाचे पाऊल मानले जाते.


हे देखील वाचा – महाराष्ट्रात ‘SIR’ मोहीम पुढे ढकलण्याची मागणी; आगामी निवडणुकांमुळे राज्य निवडणूक आयोगाचे केंद्रीय आयोगाला पत्र

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या