Home / महाराष्ट्र / Mumbai Metro: मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो ३ हजर…पंतप्रदानच्या हस्ते उद्घाटन पार पडले

Mumbai Metro: मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो ३ हजर…पंतप्रदानच्या हस्ते उद्घाटन पार पडले

Mumbai Metro: मुंबई (Mumbai) लोकलमधील दररोजची गर्दी आणि यांसह रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर नेहमीच त्रस्त झालेले असतात.. इच्छुक स्थळ...

By: Team Navakal
Mumbai Metro

Mumbai Metro: मुंबई (Mumbai) लोकलमधील दररोजची गर्दी आणि यांसह रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर नेहमीच त्रस्त झालेले असतात.. इच्छुक स्थळ गाठण, कार्यालय गाठण हॆ मुंबईकरांसाठी कठीण होऊन बसल आहे.. आणि यातून मार्ग काढायणासाठी आता एमएमआरडीए कडून मेट्रोच (Metro)जाळ हॆ मुंबईमध्ये विस्तारित करण्यात आलं आहे..तर दुसरीकडे एमएमआरसीये कडून भुयारी मेट्रोचा प्रकल्प देखील राबवण्यात आला आहे…आज वेगळवेगळ्या भागामध्ये मेट्रोच उदघाटन झालं. त्यापैकी जेवीएलआर ते आचार्य अत्रे पर्यंतचा भुयारी मेट्रो मार्ग हा कार्यानवीत करण्यात आला आहे.. याच बरोबर कफ परेड पर्यंतच्या भुयारी मार्गाच आज उद्घाटन पार पडलं..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मेट्रो मार्गिकेच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन पार पडलं. या ११.२ किलोमीटरच्या टप्प्यामुळे संपूर्ण ३३.०५ किमी लांबीची लाईन पूर्ण होऊन आरे ते कफ परेडपर्यंत अखंड प्रवास शक्य झाला आहे. हा प्रकल्प सुमारे ३७. २७० कोटी रुपये इतका खर्च यावर करण्यात आला आहे. या मार्गावरून दररोज 13 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. ही मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका असून शहरातील गर्दी कमी करण्यात आणि लोकलवरील भार कमी करण्यात महत्वाची भूमिका पार पडणार आहे.

या मार्गिकेवर सकाळी 5:55 ते रात्री 10:30 पर्यंत मेट्रो गाड्या धावणार आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल, तर दिवसभरात एकूण २८० फेऱ्या होणार आहेत. एमएमआरसीकडील 28 अत्याधुनिक मेट्रो गाड्या या सेवेसाठी सज्ज आहेत. या मार्गावर एकूण २७ स्थानके असून त्यापैकी २६ स्थानके हे भूमिगत आहेत. या मेट्रोमुळे दक्षिण मुंबई, वरळी, बीकेसी, आरे, धारावी यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये सहज पोहोचणे आता शक्य होणार आहे.
या मार्गिकेचे तिकीट या प्रवासात किमान भाड हॆ 10 रुपये तर कमाल तिकीट हॆ 70 रुपये इतकं आहे.. यामुळे लोकलवरील ताण देखील कमी व्हायला मदत होणार आहे.

कफ परेड ते आरे दरम्यानच्या या मेट्रो मार्गिकेवर एकूण 27 स्थानक समाविष्ट आहेत. यात कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, नेहरू सायन्स सेंटर, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धीविनायक, दादर, धारावी, बीकेसी, सांताक्रूज, विमानतळ आणि आरे या सर्व स्थानकांचा समावेश आहे.


Shamrao Ashtekar passes away: शरद पवारांच्या निष्ठावान समर्थकाचे निधन; कराडचे माजी आमदार शामराव अष्टेकरांचे निधन

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या