Home / महाराष्ट्र / Mumbai MHADA Homes :दक्षिण मुंबईतील म्हाडाची ‘ती’ आलिशान घरं कोणीही खरेदी करु शकत..काय आहे नवी योजना?

Mumbai MHADA Homes :दक्षिण मुंबईतील म्हाडाची ‘ती’ आलिशान घरं कोणीही खरेदी करु शकत..काय आहे नवी योजना?

Mumbai MHADA Homes : मुंबईत आपलं स्वतःच हक्काच घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यामागचा संघर्ष आणि मेहनत ज्याची त्याला...

By: Team Navakal
Mumbai MHADA Homes

Mumbai MHADA Homes : मुंबईत आपलं स्वतःच हक्काच घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यामागचा संघर्ष आणि मेहनत ज्याची त्याला माहिती असते. घर घेण्यासाठीची आर्थिक जुळवाजुळ या सगळ्यात बऱ्याच वर्षांची प्रतीक्षासुद्धा असते. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा (MHADA) आणि सिडकोकडून देखील बरीच मदत होते. परंतु काही प्रसंगी मात्र या योजना अपवाद ठरतात.

मुंबईत (mumbai) अशीच काही म्हाडाची अपवादात्मक घर खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. दोनवेळा सोडत काढूनही या घरांना अद्यापही खरेदीदार सापडलेला नाही. त्यामुळे दक्षिण मुंबईतील या आलिशान घरांची आता म्हाडाकडून ‘ओपन टू ऑल’ तत्त्वाअंतर्गत विक्री केली जाणार आहे. अर्थात हि घर आर्थिक कुवतीनुसार कोणत्याही श्रेणीतील व्यक्तींना खरेदी करता येणार आहेत.

नेमकी कुठे आहेत ही घर?

दक्षिण मुंबईतील ताडदेव या ठिकाणी ही घरं आहेत. या घरची किंमत ६ ते ७ कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे. इतका दर असणाऱ्या या घरांना सोडत प्रक्रियेत समाविष्ट करून देखील खरेदीरारांनी या घरांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता ‘Open to All’ या प्रमुख तत्त्वानुसार घरांची विक्री झाली नाही तर हीच घर भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय देखील म्हाडाने खुला ठेवला आहे.

नेमकी काय आहे Open to All योजना?

मिळालेल्या माहितीनुसार आता आर्थिक क्षमतेनुसार कोणत्याही श्रेणीतील खरेदीदारांना घर खरेदी करता येणार आहेत, परंतु ज्या किमतीती ती घर आहेत त्याच  किमतीत विकली जातील. या पर्यायानंतरी घरांची विक्री झाली नाही, तर; ती भाडेतत्त्वावर दिली जातील.

ताडदेवमधील म्हाडाची घर नेमकी कुठे?

दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये ही आलिशान घर आहेत. म्हाडाच्या या निर्णयामुळे म्हाडाची हि प्रशस्त घर आता कोणीही विकत घेऊ शकत


हे देखील वाचा –

नवीन Mahindra Bolero 2025 लाँच; टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ‘स्टेल्थ ब्लॅक’ रंगात दमदार अपडेट्स, जाणून घ्या किंमत

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या