Mumbai Morcha : राजकीय वर्तुळात काही ना काही कारणावरून कायमच राजकारण गाजत असत.आता मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज मुंबईत महाएल्गार मोर्चा पुकारण्यात आला. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आयोगाविरोधात हा सत्याचा महामोर्चा काढला. आयोगाचा बेफिकीरपणा तसेच बेजवाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार हे या महामोर्चाचे उद्धिष्ट आहे.
मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत फॅशन स्ट्रीट ते महापालिके पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे बंधूंनी दुबार-तिबार मतदानाला आले तर त्यांना फोडून काढण्याचे आदेश कार्यकर्त्याना दिले आहे. मोर्चादरम्यान मतदार याद्यांतील घोळांविरोधात न्यायालयात पुरावे सादर केले जाणार असल्याचे देखील जाहीर केले.
मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे, उबठा प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाकपचे प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि शेकापचे जयंत पाटील यांसह अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित होते. मोर्चासाठी फॅशन स्ट्रीटपासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंतच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. या मोर्चात राज ठाकरे उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांनी मतदार याद्यांमधील घोळावरून प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या मोर्चानंतर आता तरी निवडणूक आयोग मतदार यादीची पुन्हा तपासणी करणार का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – Mumbai Morcha : मुंबईत सत्याच्या मोर्च्याची लढाई! विरोधकांचा महाएल्गार मोर्चा..









