Home / महाराष्ट्र / Mumbai Morcha : सत्याच्या मोर्चात माविआ आणि मनसेचे एकत्रित शक्तिप्रदर्शन?

Mumbai Morcha : सत्याच्या मोर्चात माविआ आणि मनसेचे एकत्रित शक्तिप्रदर्शन?

Mumbai Morcha : मागच्या काही काळापासून महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचामुद्दा सातत्याने उफाळून बाहेर येत आहे. पण हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरताच...

By: Team Navakal
Mumbai Morcha
Social + WhatsApp CTA

Mumbai Morcha : मागच्या काही काळापासून महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचामुद्दा सातत्याने उफाळून बाहेर येत आहे. पण हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे का? तर तस नाही महाराष्ट्रा बाहेर देखील विरोधी पक्ष नेते यांच्या तीव्र प्रतिक्रिया बाहेर आल्या आहेत. पण हा मुद्दा इतक्या उशिरा का बाहेर आला? निवडणूक तोंडावर आल्या तेव्हा विरोधकांना जाग आली का? तहान लागली कि विहीर खोदली अशी मानसिकता तर आता महाराष्ट्रात राहिली नाही भले खूप आधीपासूनच निवडणुक आयोगावर सातत्याने ताशेरे ओढले जात होते पण याबाबत ठोस अशी भूमिका घेतली जात न्हवती. त्यातही निवडणूक आयोगाच्या बचावार्थ सतत भाजपा यायची त्यामुळे सामान्य जनतेची शंका अधिक प्रबळ होत होती.

महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा सातत्याने निषेध करण्यासाठी राज्यातील विरोधी बाकावर बसणारी माविआ आणि मनसे अखेर रस्त्यावर उतरले आणि याचा तीव्र निषेध केला. थोडक्यात याचा दिखावा केला का? ह्या बद्दल सुद्धा संभ्रम आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला सुद्धा पारदर्शक मतदानाचं हवे आहे. त्यामुळे सामान्य जनतेने कमी अधिक प्रमाणात का होईना या मुद्द्याला आपला पाठिंबा दाखवला कारण निवडणूक आयोगाची आधी असणारी सतच मौन याला सर्वाधिक कारणीभूत होत. बरीच चर्चा आणि गाजावाजा झालेला हा मोर्चा अखेर पार पडला आणि बरैच दिवसांनी विरोधकांची एकजूट या निमित्ताने व्यासपीठावर पहायला मिळाली. या मोर्चाच्या निमित्ताने नवीन समीकरण देखील बघायला मिळाले. माविआ अशी नवीन सांगड शनिवारच्या मुंबईतील ‘सत्याचा मोर्चा’मध्ये बघायला मिळाली.

महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची एकजूट राहीलच हे सांगणे अधिक कठीणच आहे. या मोर्च्यावर अनेक सत्ताधारी पक्षांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली. शिवाय विधान सभा निवडणुकीतील पराभवानंतर माविया विस्कटलेली दिसून आली या निमित्ताने त्यांच्यात तुटक का होईना पण ऐकी होती. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘अशीच एकजूट ठेवा’, हा जो सल्ला त्यांच्या भाषणात दिला त्याचा सन्मान करत सगळे निवडणुकीतही एकत्र राहतील, याची हमी कोणीही आज देऊ शकत नाही.

२०१९ मध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांना एकत्र आणले होते आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले. आता तोच धागा पुढे नेत राज ठाकरेंनाही सहभागी करून घेतले, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. या मोर्चा निमित्त दुसरी एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे ठाकरे घराण्यातील एकजुटीची आता अर्थात हि एकजूट कधी पर्यंत टिकून राहील हे सांगणं तस कठीणच. या मोर्चात राज यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली दुबार मतदारांना बडवा असे आव्हान देखील त्यांनी केले. पण यावर सामान्य जनतेने देखील तितकाच प्रतिसाद दिला कारण हे कुठे ना कुठे तरी खरे आहेच. पारदर्शक मतदान हवं असेल तर हि घुसखोरी थांबणं अत्यंत महत्वाचं आहे. पण सत्ताधार्यांना काही हि भूमिका पटली नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

राज यांचे लहरी राजकारण काँग्रेसच्या पचनी पडेल याची काही खात्री नाही. मात्र, कालच्या मोर्चाला मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता भाजपविरोधात सगळ्यांनीच एकत्र यायला हवे, अशी प्रबळ इच्छा यात दिसून आली. या महत्वकांगशेचा सन्मान झाला अन् सगळे एकत्र राहिले, तर मुंबईसह राज्यात वेगळे चित्र दिसू शकेल. पण यावर आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन या एकजुटीवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा सातत्याने निषेध करण्यासाठी राज्यातील विरोधी बाकावर बसणारी माविआ आणि मनसे यांनी संयुक्तपणे काढलेला ‘सत्याचा मोर्चा’ हा माविआला आणि मनसेला महापालिका निवडणुकीमध्ये सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतो का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा –

Mumbai Morcha : सत्याच्या महामोर्चात विरोधकांचा संताप..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या