Home / महाराष्ट्र / Mumbai Morcha : मुंबईत सत्याच्या मोर्च्याची लढाई! विरोधकांचा महाएल्गार मोर्चा..

Mumbai Morcha : मुंबईत सत्याच्या मोर्च्याची लढाई! विरोधकांचा महाएल्गार मोर्चा..

Mumbai Morcha : राजकीय वर्तुळात काही ना काही कारणावरून कायमच राजकारण गाजत असत.आता मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी...

By: Team Navakal
Mumbai Morcha

Mumbai Morcha : राजकीय वर्तुळात काही ना काही कारणावरून कायमच राजकारण गाजत असत.आता मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज मुंबईत महाएल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात हा महामोर्चा काढणार आहे.

सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नाव प्रसिद्ध झालं आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे असे बडे नेते या मोर्चात उपस्थित असणार आहेत. आयोगाचा बेफिकीरपणा तसेच बेजवाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार हे या महामोर्चाचे उद्धिष्ट आहे.

लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं हे या मोर्चाचे मुख्य उद्धिष्ट आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी केंद्रीय देखील राज्य निवडणूक आयोगाला याबाबत पत्र दिलं होतं. मात्र निवदेनं देऊन देखील काही उपयोग नसल्याने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं मविआ आणि मनसेने सांगितलं आहे.

विरोधकांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय ?

१) महापालिका निवडणुकांच्या आधी मतदार याद्या अद्ययावत करा, त्यात कुठल्याही प्रकारची चूक नको
२) मतदार याद्या अद्ययावत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, त्यासाठी अगदी सहा महिन्यांचा कालावधी लागला तरीही चालेल.
३) मतदार याद्यांमधली दुबार नावं हटवा
४) सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

या चार प्रमुख मागण्या मनसेने आणि माविआने केल्या आहेत. सत्याचा मोर्चा याच प्रमुख मागण्यांसाठी काढला जाणार आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा गंभीर आरोप केला होता. यात निवडणूक आयोग आणि भाजपा यांचं एकत्रीकरण असल्याचंही म्हटलं होतं. आता राज्यातही माविआ आणि मनसेने देखील मतदार याद्यांचे घोळ आहेत असा आरोप केला आहे.

मोर्चाचा मार्ग नेमका कश्या पद्धतीचा असेल?
दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान मुंबईतील फॅशन स्ट्रीट या भागातून हा सत्याचा मोर्चा सुरु होईल. त्यानंतर फॅशन स्ट्रीटकडून मोर्चा मेट्रो सिनेमाच्या चौकात आणि त्यानंतर हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने जाईल. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ स्टेज देखील उभारण्यात आलं आहे. त्या ठिकाणी मविआच्या नेत्यांची भाषणं शिवाय राज ठाकरेंचं भाषण देखील होणार आहेत.

या मोर्चासाठी मविआने मुंबई पोलिसांकडे परवानगी पत्र पाठविले होते. मात्र; मुंबई महापालिकेचा मार्ग आणि आझाद मैदाचा परिसराच्या इथून कुठलाही मोर्चा काढता येणार नाही. शिवाय; आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नियमानुसार आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढणार असाल तर त्याला परवानगी दिली जाणार नाही,अशी भूमिका पोलिसविभागाने घेतल्याची माहिती आहे. परिणामी अद्याप देखील या मोर्चा पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही.

त्यातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआला आणि मनसेला थेट इशारा दिला आहे. मनसे आणि मविआने पर्वांगीशिवाय मोर्चा काढला तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, असा कठोर इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यामोर्चावर अनेक सत्ताधाऱ्यांकडून अनेक टीका देखील करण्यात आल्या.

काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकलने प्रवास करत चर्चगेटला पोचले आहेत. चर्चगेटला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे. त्यामुळे यावेळी मविआ आणि मनसे यांची एकजूट सत्ताधाऱ्यांवर मत करू शकते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मोर्चाला उपस्थित राहणारे नेते-
उद्धव ठाकरे, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
राज ठाकरे, मनसे
शरद पवार, राष्ट्रवादी(शरद पवार)
विजय वडेट्टीवार,काँग्रेस
बाळासाहेब थोरात,काँग्रेस
सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी
जितेंद्र आव्हाड,राष्ट्रवादी
जयंत पाटील,राष्ट्रवादी
रोहित पवार,राष्ट्रवादी
शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी
आदित्य ठाकरे,शिवसेना
बाळा नांदगावकर, मनसे
जयंत पाटील, शेकाप
प्रकाश रेड्डी, भाकप
अनिल परब,शिवसेना
अनिल देसाई, शिवसेना
अरविंद सावंत, शिवसेना
राजन विचारे , शिवसेना
सचिन अहिर , शिवसेना
अंबादास दानवे, शिवसेना
सुनील प्रभू, शिवसेना
सुनील शिंदे, शिवसेना
अविनाश अभ्यंकर, मनसे
नितीन सरदेसाई, मनसे
संदीप देशपांडे, मनसे
अविनाश जाधव,मनसे
नसीम खान, काँग्रेस
सचिन सावंत, काँग्रेस
अमीन पटेल, काँग्रेस


हे देखील वाचा – Bank FD Rates : कमी कालावधीत जास्त परतावा! 1 वर्षाच्या FD वर ‘या’ 8 बँका देतात सर्वाधिक व्याज

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या