Mumbai News : भारताची सुरक्षा हि आपल्या सगळ्यांचीच जवाबदारी आहे आणि आता याच भारताच्या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक मोठी घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात या व्यक्तीने स्वतःला BARC मधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. या आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतली असता तपासकर्त्यांना थेट ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे आणि कागदपत्रे सापडल्याची अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत सातत्याने माहिती मिळत होती, जो स्वतःला BARC मधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता पर्यायाने तो ते सांगतही होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेन याला अटक केली. त्याच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित संवेदनशील नकाशे, तांत्रिक टिपा आणि इतर दस्तऐवज होते.
प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नसल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा थेट परदेशी गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, या मागचा मास्टरमाईंड नेमका कोण आणि या माध्यमातून घातपाताचा कट होता का या संदर्भात आता या संदर्भातील चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे.
अख्तर हुसेनने मागील काही वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्कांचा तपास देखील घेण्यात आला. त्यात काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर पैलू समोर येण्याची शक्यता आहे. अशी शंका वर्तवली जात आहे. देशद्रोहाच्या तरतुदींनुसार अख्तर हुसेनला कठोर शिक्षा होऊ शकते.
हे देखील वाचा – Lokpal : भ्रष्टाचारविरोधी संस्थाच वादात! लोकपाल सदस्यांना हवी 70 लाखांची BMW कार; निर्णयावर जोरदार टीका