Home / महाराष्ट्र / लखपती रिक्षा चालकावर मुंबई पोलिसांची कारवाई

लखपती रिक्षा चालकावर मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई – अमेरिकन वकिलातीच्या (American Embassy) वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात Visaसाठी येणाऱ्या लोकांचे किमती सामान सुरक्षित ठेवण्याची अनोखी सेवा देऊन महिना...

By: Team Navakal
Lakhpati rickshaw driver


मुंबई – अमेरिकन वकिलातीच्या (American Embassy) वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात Visaसाठी येणाऱ्या लोकांचे किमती सामान सुरक्षित ठेवण्याची अनोखी सेवा देऊन महिना सात-आठ लाख रुपये कमावणाऱ्या रिक्षा चालकासह १२ जणांवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे.
हा रिक्षा चालक अमेरिकन वकिलातीसमोर रिक्षा उभी करून दिवसभर तिथेच थांबायचा. वकिलातीत व्हिसासाठी येणाऱ्या लोकांना आपल्यासोबत मोबाईल फोन, पर्स, बॅग असे कोणतेही सामान नेण्यास परवानगी नाही. लोकांची ही गैरसोय ओळखून हा रिक्षाचालक लोकांचे किंमती सामान आपल्या रिक्षात सुरक्षित ठेवायचा. त्या बदल्यात तो प्रत्येकाकडून एक हजार रुपये घ्यायचा. त्याचा हा अनोखा व्यवसाय VenueMonk.com या स्टार्टअप कंपनीचे मालक राहुल रुपानी यांना भलतीच आवडली. त्यांनी त्याची मुलाखत घेऊन ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn शेअर केली. मुलाखतीत रिक्षा चालकाने या व्यवसायातून आपण दरमहा सात-आठ लाख रुपयांची कमाई करतो असे सांगितले होते. LinkedInवरील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रिक्षाचालक Social media वर चांगलाच लोकप्रिय झाला. पोलिसांनाही याची माहिती मिळाली. त्यानंतर बेकायदेशीर व्यवसाय केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह १२ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या