Home / महाराष्ट्र / Swachh Survekshan: देशातील स्वच्छ सर्वेक्षणात मुंबई शहराची वाईट कामगिरी

Swachh Survekshan: देशातील स्वच्छ सर्वेक्षणात मुंबई शहराची वाईट कामगिरी

Swachh Survekshan : देशातील शहरांच्या यावर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचा (Mumbai) ३३ वा क्रमांक आला आहे. मुंबई हे देशातील अस्वच्छ...

By: Team Navakal
Swachh Survekshan
Social + WhatsApp CTA


Swachh Survekshan : देशातील शहरांच्या यावर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईचा (Mumbai) ३३ वा क्रमांक आला आहे. मुंबई हे देशातील अस्वच्छ शहरांच्या यादीत तळाशी असून अहमदाबादने (Ahmedabad)पहिला क्रमांक पटकावला आहे.


देशातील शहरांमधील एकंदरीत स्वच्छता (cleanliness), घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था व व्यवस्थापन (Sewage disposal systems)आदी गोष्टींचा विचार करुन हे स्वच्छता सर्वेक्षण केले जात असते. त्यानंतर या शहरांना त्यातील स्वच्छतेच्या अनुषंगाने १ ते ४० असे क्रमांक दिले जातात. या यादीत मुंबई अगदी तळाशी आली असून तिने ३३ वा क्रमांक पटकावला आहे.

श्रीनगर (Srinagar)मुंबईपेक्षा थोडे स्वच्छ शहर असून त्यांचा क्रमांक ३२ आहे. मदुराई हे देशातील सर्वात अस्वच्छ शहर असून त्याचा क्रमांक सर्वात तळाशी ४० वा आहे. राजधानी दिल्लीही ३१ व्या स्थानावर आहे. तर लुधियाना, चेन्नई, रांची, बंगळुरु ही शहरेही तळाशी आहेत. अहमदाबाद शहर या सर्वेक्षणात अव्वल ठरले आहे. त्या खालोखाल भोपाळ, लखनौ, रायपूर, जबलपूर (Jabalpur) हे पहिल्या पाचात आहेत. राज्यातील पिंपरी चिंचवड या एकाच शहराने अव्वल यादीत स्थान मिळवले आहे.


हे देखील वाचा –

सुप्रीम कोर्ट शुक्रवारी देणार भटक्या कुत्र्यांबद्दल आदेश!

शेलारांना आशिष कुरेशी म्हणावे उबाठा नेते अखिल चित्रेंची टीका

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या चारही याचिका

Web Title:
संबंधित बातम्या