Mumbai Protests : बांगलादेशातील अत्याचाराचा थरार हा अवघ्या जगभर पसरलायचे चित्र आहे. याच पार्शवभूमीवर आज दिल्ली मध्ये देखील जोरदार आंदोलन पेटले. याचबरोबर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेदार्थ मुंबईमध्ये देखील जोरदार आंदोलन करण्यात आलेल आहे. मुंबई बांग्लादेशच्या दूतावासा बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला असल्याचे चित्र आहे.
आंदोलकांनी घोषणाबाजी करत हिंदूंवरील अत्याचार निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे. आणि या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. हिंदू संघटनाचा आक्रमतेच्या थराराचा व्हिडिओ माध्यमांवर जोरदार वायरल होत आहे. निदर्शक बॅरिकेड्स देखील पाडण्यात आले आहेत. हिंदू संघटनांनी जोरदार आंदोलन केले आहे. हातात भगवे झेंडे घेऊन जोरदार घोषणा बाजी करण्यात येत आहे. रस्त्यावरील हिंदुत्वादी संघटनांना रोखण्यासाठी पोलिसांचा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन कोणतं वळण घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा –
IndiGo Airlines : तुर्कीची विमाने वापरण्यास इंडिगोला मार्चपर्यंतच मुदत









