Mumbai Railway Block : मेगाब्लॉक म्हटलं कि बऱ्याच जणांच्या भुवया उंचावतात. त्यामुळे बऱ्याचदा गैरसोयीचा देखील तोंड द्यावे लागते. मध्य रेल्वेने २१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉकची केली घोषणा. विशेष म्हणजे या ब्लॉकदरम्यान केवळ लोकल ट्रेन नाही तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही फटका बसणार आहे. अनेक गाड्या शेवटच्या स्थानका आधीच टर्मिनेट केल्या जाणार असून याचा रेल्वेच्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
रविवारी मध्य रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिका आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवेबरोबरच एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगा ब्लॉकचा परिणाम प्रकर्षाने दिसून येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
लांब पल्ल्यांच्या कोण कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
अप मार्गावरील सिंहगड, राज्यराणी, डेक्कन क्वीनसारख्या पुण्यातून येणाऱ्या गाड्यांनाही याचा फटका बसणार. याचबरोबर जनता,काकीनाडा, प्रगती, सेवाग्राम, चेन्नई, वंदे भारत, बनारस, हावडा, हाटिया, कोइम्बतूर या एक्स्प्रेसवर, तर डाऊन मार्गावरील कोल्हापूर, गोंडा गोदान, जयनगर पवन, नेत्रावती या महत्वाच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे.
हार्बर मार्गावर या सथानकांवर असणार ब्लॉक?
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊंन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक ११:०५ ते १६:०५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून मुंबईकडे धावणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०:३३ ते १५:४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या लोकल पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ९:४५ ते १५:१२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
ट्रान्स हार्बरवरील पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या ११:०२ ते १५:५३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या आणि ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या १०:०१ ते १५:२० वाजण्यादरम्यानच्या लोकल रद्द केल्या जाणार आहेत.
ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान विशेष लोकल देखील चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान या सेवा उपलब्ध राहणार आहेत. बेलापूर/नेरूळ आणि उरण सेवा सुरू राहणार आहेत.
वसई रोड-दिवा ही सकाळी ०९:५० वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपरला १०:३१ वाजता शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा – Railway Block : कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक; ३० दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक









