Home / महाराष्ट्र / Bmc election:मुंबईची प्रारूप मतदार यादी आज येणार! विरोधकांचे लक्ष

Bmc election:मुंबईची प्रारूप मतदार यादी आज येणार! विरोधकांचे लक्ष

Bmc election – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविहाकास आघाडी आणि मनसेने राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार नावे आणि बोगस...

By: Team Navakal
BMC
Social + WhatsApp CTA

 Bmc election – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविहाकास आघाडी आणि मनसेने राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार नावे आणि बोगस मतदारांचे पुरावे देत निवडणूक आयोगासह भाजपा सरकारला कोंडीत पकडले आहे. काही सत्ताधारी मंत्री, आमदारांनीही या प्रकाराची कबुली दिल्याने मतदारयाद्यांचा घोळ अधिकच वाढला आहे. या वातावरणात मुंबई महापालिकेची (Bmc election) प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्याकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. मतदारयाद्यांचा घोळ पाहता पालिकेच्या पारूप मतदार यादीवरील हरकती-सूचनांमधून नवा वाद पेटणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन चेहरा पाहून मतदार यादी तपासण्याचे आदेश दिले आहेत. तर उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मतदारयाद्यांना बिल्डिंग, चाळ गल्लीच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर लावा, असे शिवसैनिकांना सांगितले आहे. काँग्रेसनेही दुबार नोंदणी आणि मतचोरीचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्वांचे लक्ष पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांकडे आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा पालिका प्रारूप मतदार यादी अधिक सखोलपणे तपासली जाण्याची शक्यता आहे.


सध्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रभागनिहाय विभागण्याचे काम निवडणूक विभागात सुरू आहे. वेळ कमी असल्याने संगणकाच्या मदतीने हे काम सुरू आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून मतदार यादी तयार करण्याचा दावा निवडणूक आयोग करीत असला तरी लाखो चुका, दुबार मतदार, बोगस मतदार असल्याच्या तक्रारी, हरकती आणि सूचनांची संख्या वाढणार आहे. मतदार यादी विधानसभा मतदारसंघातील पाच ते सहा प्रभागात विभागली जाताना पारंपरिक मतदारांचे विभाजन अटळ आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी केंद्रावर जाताना नाहक त्रास होणार आहे. यामुळे महापालिकेची प्रारूप मतदार यादीदेखील वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले

देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या