Home / महाराष्ट्र / Mumbra train accident: लोकल दुर्घटनेतील डबा कळवा कारशेडमध्ये रवाना

Mumbra train accident: लोकल दुर्घटनेतील डबा कळवा कारशेडमध्ये रवाना

मुंबई- Mumbra रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आता ज्या local coach मधून प्रवासी पडले, तो डबा...

By: Team Navakal
Mumbra train accident

मुंबई- Mumbra रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आता ज्या local coach मधून प्रवासी पडले, तो डबा कळवा कारशेडमध्ये रवाना करण्यात आला आहे. या डब्यामध्ये काही दोष आहे का?याची तपासणी करण्यात येणार आहे.


ही दुर्घटना वळणामुळे झाल्याची बाब समोर आली होती. परंतु, रेल्वे रूळाला सुमारे २.५ अंशाचे वळण असून यामुळे दुर्घटना झाली नसल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. तसेच घटनास्थळी रेल्वे रूळांच्या वळणाचे मोजमाप केले. यामध्ये रेल्वे रूळाचे वळण या घटनेला कारणीभूत नसल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकामधील CCTV कॅमेऱ्यांतील चित्रिकरणाची पाहणी केली असता, प्रवासी पडतानाचे चित्रिकरण झाले नसल्याचे तपासामध्ये अडचणी येत आहेत. मुंब्रा स्थानकातील फलाटावरील कॅमेऱ्यामध्ये लोकल येत असल्याचे दृश्य कैद झाले. मात्र त्यानंतर लोकलमधील प्रवासी रुळावर पडतानाचे दृश्य कैद झालेले नाही. यामुळे घटनेचे कारण समजण्यास अडथळा येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या