Home / महाराष्ट्र / Mumbra Police Rescue Baby : मुंब्रातून ३ महिन्यांच्या बाळाचे अपहरण; ‘मदती’च्या बहाण्याने बाळ पळवले; सहा दिवसांच्या तपासानंतर टोळी जेरबंद..

Mumbra Police Rescue Baby : मुंब्रातून ३ महिन्यांच्या बाळाचे अपहरण; ‘मदती’च्या बहाण्याने बाळ पळवले; सहा दिवसांच्या तपासानंतर टोळी जेरबंद..

Mumbra Police Rescue Baby : मुंब्रा परिसरातून तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला...

By: Team Navakal
Mumbra Police Rescue Baby
Social + WhatsApp CTA

Mumbra Police Rescue Baby : मुंब्रा परिसरातून तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तब्बल १,६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि अहोरात्र मेहनतीनंतर अपहरण झालेल्या आफिया या बालिकेची अकोला जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात आली. सलग सहा दिवस दररोज १६ ते १८ तास तपास करून पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

२२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता मुंब्रा येथील खाडीमशीन रोडवर ही घटना घडली. फिर्यादी फरजाना मन्सुरी या आपल्या दोन मुलींना घेऊन रस्ता ओलांडत असताना एका अनोळखी महिलेने मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला, आफियाला, कडेवर घेतले. गर्दीचा फायदा घेत त्या महिलेने बाळासह पळ काढला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले की, आरोपी महिलेने मुंब्रा ते ठाणे प्रवासात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अनेकदा कपडे, नकाब आणि बाळाचे पांघरूण बदलले. सीसीटीव्ही साखळी, तांत्रिक तपास आणि एका रिक्षाचालकाचा माग काढत पोलिसांनी संशयित नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतून टोळीतील इतरांचा माग काढण्यात आला आणि अखेर बालिकेची अकोला जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात यश आले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या