Ganeshotsav : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)आणि चंद्रपूरचे भाजपा आमदार किशोर (MLA Kishor Jorgewar) जोरगेवार यांच्यातील संघर्ष शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. गणेशोत्सवात साध्या मंडपावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला.
आमदार जोरगेवार यांना भाजपात घेण्यास मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly elections) जोरदार विरोध केला होता. त्याकडे दुर्लक्ष करत भाजपाने त्यांना प्रवेश दिला. तसेच चंद्रपूर (Chandrapur) विधानसभा मतदारसंघाचे तिकीटही दिले. मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत त्यांनी धाव घेतली होती. मात्र, जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते मोठ्या मतांनी विजयी झाले. तेव्हापासून दोन्ही नेत्यांत तणाव कायम आहे.
अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi)दिवशी चंद्रपूर शहरात निघणाऱ्या भव्य गणेश विसर्जन यात्रेचे स्वागत करण्यासाठी लोकमान्य टिळक शाळेजवळ (Lokmanya Tilak School)दरवर्षी मंडप उभारला जातो. यंदा भाजपाचे माजी शहरप्रमुख राहुल पावडे (Rahul Pawade) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मंडप उभारला. त्याच जागेवर आमदार जोरगेवार यांचे समर्थक आणि भाजप शहराध्यक्ष सुभाष कासनगोटुवार (Subhash Kasangotuwar)यांनी आक्षेप घेत स्वतःच्या गटाचा मंडप उभारण्याची घोषणाकेली. यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. या घटनेमुळे चंद्रपुरात भाजपामधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली असून, आगामी राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मालमत्ता जप्तीविरोधातील मेमनच्या नातेवाईकांची याचिका फेटाळली