Municipal Election : राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल देखील पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत; तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूनी देखील जोर लावला आहे. त्यासाठी ठाकरे बंधूंची आपली युती देखील जाहीर केली. यावर अनेकदा टीका देखील झाली.
आणि आता याच पार्शवभूमीवर संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीआधीच वातावरण देखील तापायला सूरूवात झाली आहे. जागावाटपाचा तिढा काही जगावर जरी सुटला असला तरी काही ठिकाणी मात्र हा तिढा आद्यपही सुटलेला नाही.
शिवाय महापालिका निवडणुकांना मध्य ठेवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात भव्य अशी मशाल रॅली काढली होती. आज ही रॅली चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या मशाल रॅलीत कार्यकर्त्यानी हातात मशाली घेऊन संभाजीनगर मध्ये हि भव्य दिव्य अशी मशाल रॅली काढली. या रॅलीच्या वेळी त्यांनी मतदारांना पाठीशी उभे राहण्यासाठी आव्हान देखील केले. त्यामुळे ठाकरे बंधूंची हि युती महायुतीला भारी पडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









