Home / महाराष्ट्र / Municipal elections :नगरपालिका निवडणुकीत भाजपा, शिंदे, अजित पवारच जोरात! ठाकरे बंधू मुंबईत बसून राहिले! दणदणीत हरले! शरद पवारांनाही नाकारले

Municipal elections :नगरपालिका निवडणुकीत भाजपा, शिंदे, अजित पवारच जोरात! ठाकरे बंधू मुंबईत बसून राहिले! दणदणीत हरले! शरद पवारांनाही नाकारले

Municipal elections – आज 288 नगराध्यक्ष आणि नगरपालिकांचे (Municipal elections) निकाल जाहीर झाले. यात भाजपाने दणदणीत यश मिळवले. शिंदेसेनेने सत्तेत...

By: Team Navakal
bjp
Social + WhatsApp CTA

Municipal elections – आज 288 नगराध्यक्ष आणि नगरपालिकांचे (Municipal elections) निकाल जाहीर झाले. यात भाजपाने दणदणीत यश मिळवले. शिंदेसेनेने सत्तेत हातपाय पसरले. कोकणही उबाठाकडून खेचून घेतले. अजित पवारांनी आपले गड राखले. विरोधकांची मात्र अब्रू गेली. काँग्रेसने दोन आकडी विजय मिळवून जरातरी लाज राखली. पण ठाकरे बंधू दणदणीत हारले. गावागावातील मराठी माणसांनीच ठाकरे बंधूंची मशाल विझवली आणि इंजिन थेट यार्डात नेले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही केविलवाणी अवस्था झाली. त्यामुळे शरद पवारांनी आता निवृत्त होऊन अजित पवारांकडे पूर्ण पक्ष सोपवावा ही स्थिती प्रकर्षाने पुढे आली.


ही निवडणूक जाहीर झाल्यावर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार प्रचार करीत गरागरा फिरले. ‘कमळ म्हणजे कमळच’ ही घोषणा करीत फडणवीसांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली. हे सर्व सुरू असताना शरद पवार कुठेच गेले नाहीत. त्यांचे दौरे, त्यांच्या सभाच झाल्या नाहीत. सुप्रिया सुळे नेहमीप्रमाणे संसदेतील आपली भाषणे आणि जिंदालच्या मुलीच्या लग्नसमारंभात गुंतल्या होत्या. काँग्रेसचे गावभरातील स्वयंभू नेते आहेत ज्यांनी आपापले गड राखले आणि हाताची लाज थोडीतरी राखली.


ठाकरे बंधूंनी मात्र कमाल केली. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना ठाकरे बंधू मुंबईत एकमेकांच्या घरी भेट देत बसले होते. दोघांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत की दौरे केले नाहीत. त्यांनी या निवडणुकीकडे लक्षच दिले नाही. मुंबईत बसून दोघे भाऊ हिंदुत्व आणि मराठी माणूस याचा दिंडोरा पिटत राहिले. तिकडे उद्धव ठाकरेंना 9 ठिकाणी आणि मनसेला केवळ एका ठिकाणी गावकर्‍यांनी विजयी केले. मराठी माणसांनीच दोघांचा दणदणीत पराभव केला. उद्धव आणि राज यांचे केवळ मुंबई पालिकेकडे लक्ष आहे. तिथेही युती जाहीर करण्याइतपत त्यांचे एकमत अद्याप झालेले नाही. अख्ख्या महाराष्ट्राकडे पूर्ण दुर्लक्ष करून हे बंधू मराठी भाषा कशी वाचवणार आणि हिंदुत्त्वाचा झेंडा भक्कम कसा करणार हा मोठाच प्रश्‍न आहे.


आज निकाल लागल्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांनी लगेच प्रतिक्रियाही दिली नाही. उबाठातर्फे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तेच मशीन, तेच पैसे, तेच निकाल लोकांना पैसे घेऊन मते द्यायची सवय झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पण ठाकरे बंधूंकडे पाहून पैशाच्या पलीकडे जात मराठी माणूस क्रांती का करीत नाही, याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत.
मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत होईल. अजून 72 तास शिल्लक असून, काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट करत खा. संजय राऊत यांनी टीकेचा तोच सूर निवडणूक निकालानंतर आळवला.
ते म्हणाले की, मनसेसोबत जागावाटपाची चर्चा संपली आहे.जर काही किरकोळ अडचणी निर्माण झाल्या तर त्यावर राज व उद्धव ठाकरे हे आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या शंका दूर करतील. काँग्रेस सोबत असावा ही आमची इच्छा आहे. भाजपाला रोखण्यासाठी आपण सार्‍यांनी एकत्र येणे कसे गरजेचे आहे यावर त्यांच्या दिल्ली व राज्यातल्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे हे या निकालावरून स्पष्ट झाले. यावेळी त्यांनी विरोधकांचा पैसे वाटपाचा आरोप फेटाळत लोकांनी विकासाला मत दिल्याचा दावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, या निवडणुकीत 75 टक्के जागा महायुती जिंकेल आणि त्यात भाजपा हा एक नंबरचा पक्ष असेल, असे भाकित मी आधीच केले होते. पण या निवडणुकीने नगरसेवकांचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. 2017 मध्ये आमचे 1,608 नगरसेवक होते. ती संख्या आता दुपटीहून अधिक म्हणजे 3,325 झाली आहे. एकूण नगरसेवकांच्या 48 टक्के भाजपाचे आहेत. इतिहासात कुणाला मिळाला नसेल, असा अभूतपूर्व विजय आम्हाला मिळाला आहे. विशेष म्हणजे, एकाही व्यक्तीवर, पक्षावर, नेत्यावर तसूभरही टीका न करता आम्हाला हा विजय मिळाला आहे.

मनसेचा एक नगरसेवक गुहागरमध्ये विजयी
गुहागर येथेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) यश मिळाले असून, मनसेच्या कोमल जांगळी यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवकपदी विजय मिळवला आहे. संपूर्ण निवडणुकीत मनसेला मिळालेला हा एकमेव विजय आहे. हा निकाल जाहीर होताच  विजयाचा जल्लोष करण्यात आला. गुहागर नगरपंचायतीत नगराध्यक्षपद भाजपाने पटकावले आहे तर शिवसेना-भाजपा युतीने एकूण 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

अपक्ष संगमनेर मैथिली तांबे (विजयी) आ. सत्यजित तांबे यांची पत्नी
भाजपा दोंडाई नयन कुंवररावल (विजयी) मंत्री जयकुमार रावल यांची आई
भाजपा यवतमाळ प्रियदर्शनी उईके (विजयी) मंत्री अशोक उईके यांची मुलगी
शिंदे गट मुक्ताईनगर संजना पाटील (विजयी) आ. चंद्रकांत पाटील यांची मुलगी
शिंदे गट हिंगोली रेखा बांगर  (विजयी) संजय बांगर यांची भावजय
शिंदे गट फलटण अनिकेतराजे निंबाळकर (पराभूत) रामराजे निंबाळकर यांचा पुत्र
भाजपा देवळी शोभा तडस (पराभूत) माजी खा. रामदास तडस यांची पत्नी
उबाठा अंजनगाव सुर्जी यश लवटे (पराभूत) आ.गजानन लवटे यांचा पुत्र
शिंदे गट भंडारा अश्विनी भोंडेकर (पराभूत) आ. नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी
शिंदे गट करमाळा महानंदा जगताप (पराभूत) आ. जयवंत जगताप यांची पत्नी
भाजपा दर्यापूर नलिनी भारसाकळे (पराभूत) आ. प्रकाश भारसाकळे यांची पत्नी
शिंदे गट बुलडाणा पूजा गायकवाड  (विजयी) आ. संजय गायकवाड यांची पत्नी
भाजपा चाळीसगाव प्रतिभा चव्हाण (विजयी) आ. मंगेश चव्हाण यांची पत्नी
अजित पवार (रा.) पुसद मोहिनी नाईक (विजयी) आ. इंद्रनील नाईक यांची पत्नी
भाजपा भुसावळ रजनी सावकारे (पराभूत) मंत्री संजय सावकारे यांची पत्नी
शिंदे गट नंदुरबार रत्ना रघुवंशी (विजयी) आ. चंद्रकांत रघुवंशी यांची पत्नी
शिंदे गट पाचोरा सुनीता पाटील (विजयी) आ. किशोर पाटील यांची पत्नी
शिंदे गट वैजापूर संजय बोरनारे  (पराभूत) आ. रमेश बोरनारे यांचे बंधू
शिंदे गट सिल्लोड समीर सत्तार (विजयी) आ. अब्दुल सत्तार यांचा पुत्र
काँग्रेस पाथरी जुनेद दुर्राणी (पराभूत) माजी. आ.बाबाजानी दुर्राणी यांचा पुत्र
भाजपा धामणगाव रेल्वे अर्चना रोडे (विजयी) आ. प्रताप अडसर यांची बहिण
भाजपा भद्रावती अनिल धानोरकर (पराभूत) खा. प्रतिभा धानोरकर यांचे दीर
उबाठा रत्नागिरी शिवानी माने (पराभूत) माजी आ. बाळा माने यांची सून
शिंदे गट भगूर अनिता करंजकर (पराभूत) उपनेते विजय करंजकर यांची पत्नी
भाजपा सिन्नर हेमंत वाजे (पराभूत) खा. राजाभाऊ वाजे यांचे काका
अजित पवार (रा.) गंगाखेड ऊर्मिला केंद्रे (विजयी) आ. धनंजय मुंडे यांची बहीण
शिंदे गट हदगाव रोहिणी वानखेडे  (विजयी) माजी खा. सुभाष वानखेडे यांची सून
अपक्ष अंबाजोगाई नंदकिशोर मुंदडा (विजयी) आ. नमिता मुंदडा यांची सासरे
भाजपा सासवड आनंदी जगताप (विजयी) आ. संजय जगताप यांची आई
भाजपा गेवराई गीता पवार  (विजयी) आ. लक्ष्मण पवार यांची भावजय

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा

मीरा भाईंदरमध्ये महायुतीत ‘मिठाचा खडा’? 50-50 जागांच्या मागणीवर सरनाईक ठाम; भाजपची मात्र वेगळीच रणनीती

नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; एक्स पोस्ट करत व्यक्त केला आनंद..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या