Murder Case : काळ बदलतोय जातीय वाद मिटतोय. हळू हळू सगळं बदलतय. जाती जातीतील मतभेद संपत आहेत. पण हे फक्त बोलण्या पुरतच मर्यादित राहील आहे का? हे खरच असं आहे का? कि हा फक्त एक सुंदर दिखावा आहे. बाबासाहेबांच्या निर्भीड मतांनी धाडसी कर्तृत्वाने, इथल्या माणसांचे विचार बदले असल्याचा गोड गैरसमज आता पर्यंत होता. आणि हा भ्रम तुटला तो एका घटनेने. हि तीच घटना आहे ज्याने अवघा महाराष्ट्र हादरला. हि घटना म्हणजे नांदेडची घटना. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत असल्याचे दिसून येत आहे. हा भीम जयंतीच्या मिरवणुकीचा विडिओ आहे. ज्यात सक्षम ताटे आणि गणेश मामेडवार आहे. हा तोच सक्षम ताटे ज्याला गोळ्या घालून डोक्यात फारशी घालून खून झाला आहे. आणि खून करणारा आरोपी आहे गणेश मामेडवार आपली मुलगी आंचल मामेडवार हिच्या सोबतच प्रेम प्रकरण थांबवलं नाही तिच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये होता म्ह्णून सक्षम ताटेचा खून केल्याचा आरोप गणेश मामेडवार याच्यावरती आहे.
गणेश मामेडवार याचा या प्रेम प्रकरणाला विरोध असल्याच कारण स्वतः खुद्द आंचल मामेडवार हिने सांगितलं. जात ह्या विरोधच मुख्य कारण असल्याच तिने स्पष्ट केल. आपल्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमला संपल्यानंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. आणि नांदेडच हे भयावह प्रकरण सर्वांच्या समोर आल. अगदी कालपर्यंत या प्रकरणात सक्षमचा इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याच तसेच त्याच्यवर एमपीडीए सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचे समोर आलं होत पण आता सक्षमवर दाखल असलेला गुन्हा खोटा असल्याचे अंचलनेच स्वतः सांगितलं आहे.
याशिवाय ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्यादिवशी सकाळी अंचलच्या भावाने तिला पोलीस स्टेशनला नेत सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा दावा देखील तिने केला आहे. पण अचानक असं काय घडलं जे भीम जयंतीला सक्षमसोबत नाचणाऱ्या अंचलच्या वडिलांनी त्याला संपवलं. अंचलने सक्षमच्या खुनाबद्दल कोणते खुलासे केलेत याबद्दल सविस्तर माहिती.
१. सुरवातीला सक्षमची पार्शवभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती हे समोर आले होते म्हणून अंकलच्या वडिलांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नको म्हणून आमचा सक्षमला विरोध होता दावा पोलीस चौकशीत केल्याचे समोर आले.
२. सक्षमवर एमपीडीए सारखा गंभीर गुन्हा दाखल होता. त्यामुळे तो जेलमध्ये होता दीड महिन्यांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला. पण सक्षमवर दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल अंचलने धक्कादायक खुलासा केला आहे. सक्षम हा साहिल आणि हिमेश मामेडवार यांचा खास मित्र त्यामुळे सक्षमच यांच्या घरी येन जाण होत त्यामुळेच सक्षमचे आणि अंचलची जवळीक वाढली आणि यांच्यात प्रेम संबन्ध प्रस्थापित झाले.
३. हे सगळं घडलं साधारण ३ वर्षांपूर्वी त्यावेळी दोघांचं वर १६ ते १८ एवढं होत. त्यानंतर या सगळ्याबद्दल आंचलच्या घरी कळालं तेव्हा अंचलच्या घरी मोठी अडचण निर्माण झाली.
४. अंचलने माध्यमांशी बोलताना सांगितलं साधारण वर्ष दोन वर्षांनी तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्यावर दबाव टाकायला सुरवात केली.तिला धमक्या देण्यात आल्या तू सक्षमच्या विरोधात तक्रार दाखल कर आणि जर तू असं नाही केलंस तर आम्ही सक्षमला समपूण टाकू नाहीतर आम्ही स्वतःला तरी संपवू अश्या धमक्या अंचलला तिचे घरचे देत होते.
५. त्यामुळे दबावाखातर तेव्हा मी विनयभंगाची केस दाखल केली. पण जेव्हा मी १८ वर्षांची झाले त्यानंतर लगेच कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिल्याचे अंचलने सांगितले.
६. अंचलने या संधर्भात अनेक मोठे खुलासे केले आहेत. पोलीस माझ्या वडिलांकडून पैसे घायचे माझ्या भावाने आणि वडिलांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमावले होते. मागच्या ३ वर्षात माझ्यावर त्यानी प्रचंड दबाव टाकला मला खूपदा मारहाण देखील केल्याचे अंचलने सांगितले.
७. जेव्हा सक्षम सुटून घरी आला तेव्हाच माझ्या घरचे त्याला मारायचा प्लॅन करत असल्याचे देखील अंचलने सांगितले. अंचल पुढे सांगते कि संध्याकाळी मला सांगण्यात आलं आपल्याला देव दर्शनाला जायचं आहे आणि मला परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये असलेल्या आईच्या माहेरी नेलं. त्यावेळी माझ्या सोबत माझी आई आणि काका काकू होते.
८. आमची मानवातमध्ये होतो तेव्हा तिथे पोलीस आले त्यांच्यासोबत माझे वडील आणि भाऊ सुद्धा होते तेव्हा मला सांगितले कि सक्षमला दोनतीन टाके लागले आहे. त्याला हॉस्पिटला ठेवलं आहे. तिथून पोलिसांनी सकाळी मला नांदेडला आणलं.
९. आणि त्यानंतर पोलीस चौकीत मी सक्षमच्या बॉडीचा फोटो पाहायला. तेव्हा मला समजलं सक्षमचा खून झाला आहे.
१०. पुढे ती सांगते मी त्याची साथ कधीही सोडणार नाही त्याच्या कुटुंबाच्या सोबत उभी राहीन.
या सगळ्या नंतर सक्षमच्या आईने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या तपासाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.
हे देखील वाचा –









