Home / महाराष्ट्र / Murder Case : भिवंडीत विकृतपणाचा कळस! वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या.

Murder Case : भिवंडीत विकृतपणाचा कळस! वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या.

Murder Case : भिवंडी येथील गणेशपुरी भागात एका ६५ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या केली असल्यासच विकृत प्रकार समोर आला...

By: Team Navakal
Murder Case

Murder Case : भिवंडी येथील गणेशपुरी भागात एका ६५ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या केली असल्यासच विकृत प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी रविंद्र गवते ४० वर्षीय इसमाला अटक केली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय देखील वर्तवला जात आहे. शिवाय याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात हत्या आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल तिचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत गावातील शेतामध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या मृत्यूची माहिती समजतात गावकऱ्यांनी संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात कठोरातली कठोर कारवाईची मागणी केली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले नसल्याचे देखील स्पष्ट झाले म्हणजे याचा सरळसरळ अर्थ आहे कि हे प्रकरण चोरीचे नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तपास करुन रविंद्र गवते या इसमाला या प्रकरणात अटक केली आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप तिचे नातेवाईक करत आहेत. या संदर्भातील अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.


हे देखील वाचा –

Pothole Accident : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अजून एक बळी; नगर-मनमाड महामार्गावर तरुणाचा मृत्यू…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या