Mahadev Munde’s murder case – वाल्मिक कराडच्या फोननंतर हत्येचा तपास थांबवला ! ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप

Mahadev Munde's wife threatens to commit self-immolation with family

बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २२ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक न झाल्याने महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल विषप्राशन केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मस्सजोग सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh)हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडेंच्या (MLA Dhananjay Munde) बंगल्यावरून फोन करायला लावून तपास थांबवला, असा आरोप आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आज स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग (Local Crime Branch)करण्यात आला आहे. या आधी तो परळी पोलिसांकडून अंबाजोगाई (Ambajogai)उपअधीक्षकांकडे देण्यात आला होता. २४ मार्चला हातपास गेवराईचे पोलीस उपअधीक्षक (Gevrai Deputy Superintendent)नीरज राजगुरू यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. तर त्यानंतर काही तासांतच हा तपास केजचे सहाय्यक पोलीस आधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सोपवण्यात आला होता. वारंवार तपास अधिकारी बदलले तरी आरोपीला अटक का होत नाही, असा प्रश्न मुंडे कुटुंबियांचा (Munde family questions) आहे.

ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, मला माझ्या मुलांसाठी न्याय हवा आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर माझा विश्वास आहे. पण ते केवळ तपास करतो असे उत्तर देत आहेत. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास बंद झाला. हा फोन वाल्मिक कराडने करायला लावला. सर्व कारभार वाल्मीक कराड (Walmik Karad)सांभाळत होता. पोलिसांनी कोठडीत असणाऱ्या कराडचीदेखील चौकशी केली पाहिजे. तपास का थांबवला त्याला जाब विचारा. माझ्या मुलांच्या डोक्यातील विचारातून मारेकऱ्यांना मारायचे आहे. माझ्या मुलांना सतत प्रश्न पडतो की, वडिलांना कोणी आणि का मारले? मी काय उत्तर द्यायचे? त्यामुळे मला न्याय हवा आहे. मी एक महिना थांबणार आहे. जर आरोपींना अटक झाली नाही तर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार.

भाजपा आमदार सुरेश धस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, फक्त १२ गुंठ्यांच्या वादातून महादेव मुंडे यांची हत्या झाली. गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा यांची नावे बाळा बांगर याने सांगितली आहेत. बांगर हा वाल्मिक कराडसोबत होता. पण त्यानंतरही अटक का झाली नाही? गोट्या गित्तेवर मोक्का लावूनही तो कराडच्या तारखेला न्यायालयात येतो, हे धक्कादायक आहे. आरोपींची नावे सांगून १५ दिवस झाले . एवढ्या दिवसांत आरोपींना अटक का करण्यात आली नाही ? ज्याची नियुक्ती वाल्मिक कराडने केली त्याच्याकडे महादेव मुंडे यांचा तपास (investigation) दिला आहे. ते पोलीस काय तपास करणार आहे? पोलीस कर्मचारी हे सरकारी काम करण्यापेक्षा आकाचे काम करत आहेत. त्यांचे फोन रेकॉर्ड तपासल्यावर हे उघड होईल.