Home / महाराष्ट्र / Ajit Pawar Plane Crash : जय पवारांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडिओची नागरी उड्डाण मंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश

Ajit Pawar Plane Crash : जय पवारांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडिओची नागरी उड्डाण मंत्र्यांनी घेतली दखल; चौकशीचे आदेश

Ajit Pawar Plane Crash Update: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. २८ जानेवारी रोजी...

By: Team Navakal
Ajit Pawar Plane Crash
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar Plane Crash Update: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असतानाच, आता केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये विमान कंपनीचे मालक रोहित सिंह उड्डाणादरम्यान चक्क झोपलेले दिसत आहेत. या व्हिडिओची दखल आता नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे.

मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भूमिका

पुण्यात माध्यमांशी बोलताना मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “जय पवार यांनी शेअर केलेला तो व्हिडिओ मी पाहिला असून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. विमान सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही सुरुवातीपासूनच व्हीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.

अपघात अहवालातील तांत्रिक बाबी

विमान अपघात चौकशी प्राधिकरणाने सादर केलेल्या २२ पानांच्या प्राथमिक अहवालानुसार, अपघात झाला तेव्हा बारामती विमानतळावर दृश्यमानता ३ हजार मीटर होती. विमान प्रथम झाडावर आदळले आणि नंतर जमिनीवर कोसळले. विशेष म्हणजे, उड्डाणापूर्वी वैमानिकाने मद्यपान केले नसल्याचे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, जय पवार यांनी समोर आणलेल्या पुराव्यामुळे आता तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांकडे तपासाची सुई वळली आहे.

आखाती देशांतील पर्यटकांसाठी दिलासा

यावेळी बोलताना मंत्री मोहोळ यांनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय पर्यटकांबाबतही माहिती दिली. “आखाती देशांमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित भारतात आणणे ही आमच्या मंत्रालयाची जबाबदारी आहे. विमानसेवा पूर्ववत होताच सर्वांना मायदेशी आणले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पुणे मेट्रोची विमानतळाशी कनेक्टिव्हिटी आणि नदी सुधार प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या