Home / महाराष्ट्र / Nanded News : नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

Nanded News : नांदेडमध्ये चार जणांचा रहस्यमय मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

Nanded News : नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार (जवळा) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा...

By: Team Navakal
Nanded News
Social + WhatsApp CTA

Nanded News : नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार (जवळा) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा दोन वेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःखाची लाट पसरली आहे. या गावातील लखे कुटुंबातील उमेश आणि बजरंग दोन संख्या भवानी मुगट परिसरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या दरम्यान ही वार्ता कळवण्यासाठी पोलीस लखे यांच्या घरी पोहचले. त्याठिकाणी या दोन्ही भावंडांच्या आई-वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि दोन्ही घटनास्थळांचा पंचनामा केला. मृतांमध्ये उमेश लखे याचे वय २५ वर्ष इतके होते आणि बजरंग लखे हा अवघ्या २२ वर्षाचा होता तसेच रमेश लखे ५१ वर्षाचे होते आणि आई राधाबाई लखे ४५ वर्षे इतके आहे. त्यामुळे आता ही घटना आत्महत्येची की घातपाताची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेमागे आर्थिक विवंचना कारणीभूत असण्याची शक्यता गावातील प्रतिनिधींनी व्यक्त केली.

हे देखील वाचा – Varsha Gaikwad: ‘ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात घेतले नाही’; मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या