Home / महाराष्ट्र / Nagarparishad Election Result : निवडणुकीच्या तोंडावरच हायकोर्टाचा मोठा निर्णय; उद्याची मतमोजणी रद्द

Nagarparishad Election Result : निवडणुकीच्या तोंडावरच हायकोर्टाचा मोठा निर्णय; उद्याची मतमोजणी रद्द

Nagarparishad Election Result : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे....

By: Team Navakal
Nagarparishad Election Result
Social + WhatsApp CTA

Nagarparishad Election Result : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आणि ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणूक २० डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे सगळ्याच निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर याचा प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. याबाबतच्या सगळ्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान झालं तरी त्याचे निकाल हे २१ तारखेला जाहीर केले जातील. तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येणार आहेत. त्यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहितादेखील २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात ‘घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याचा निकाल पुढे जातोय, हे याआधी कधी घडलेलं नाही हे पहिल्यांदाच होतंय. हे खरं तर यंत्रणांचं अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करणे गरजेचे. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक बघतोय, मतमोजणी पुढे ढकलणे हे मला वैयक्तिकरित्या तरी पटलेले नाही. हे अतिशय चूक आहे, माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही तर या प्रक्रियेवर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निकालाची तारीख अचानक पुढे ढकल्यामुळे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. इतका काळ ईव्हीएम सुरक्षित ठेवणे हे कठीण परंतु प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र २१ नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहे. ही निवडणूक जवळपास २८० ठिकाणांवर होत असल्यामुळे आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात करण्यात येणार असल्यामुळे जवळपास २८० पेक्षा अधिक मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम २१ नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावी लागणार आहे. शिवाय एवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल. त्यामुळे या पुढे ढकलेल्या निकालाचा भवितव्य काय असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे देखील वाचा – Malvan Election : सिंधुदुर्गात सख्या भावांमध्ये फूट? निवडणुकीआधीच मालवणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा,

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या