Nagpur Leopard : बिबट्यांचा मुक्त संचार आणि त्यांचे न संपणारे हल्ले आणि त्यात जीव गेले निरपराध लोक यांच्याबद्दल आपण रोज बऱ्याच बातम्या ऐकतो. आणि आता असाच एक बिबट्या घुसला होता नागपुरातील भांडेवाडी परिसरात. त्यामुळे नागपुरातील भांडेवाडी परिसरातील रहिवाशांसाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक आणि खळबळीची ठरली. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दाट वस्तीतील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक बिबट्या घुसल्याची खळबळजनक घटना सकाळी साधारण सातच्या सुमारास उघडकीस आली. एका लहान मुलाने आपल्या घराजवळ एका बिबट्याला पाहायल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि क्षणार्धात बघ्याची गर्दी जमा झाली.
स्थानिकांनी लगेचच “हेल्प फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूरला संपर्क साधला. संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करून टीटीसी सेंटरला यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याचे आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे काम पोलिस विभागाच्या मदतीने सुरू करण्यात आले होते. सगळीकडे जाळे बांधण्यात आली. अखेर डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर ट्रँक्विलायझरचा वापर करून त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले आणि त्याला नेण्यात आलं. तब्बल दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद वनविभागाला करण्यात यश आलं.

वनविभागाच्या प्राथमिक तपासानुसार, साधारण चार वर्षांचे वय असणारा हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये अचानक अडकल्यामुळे घाबरलेला होता आणि तो आपली सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.
बिबट्याला सध्या कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली आहे का, याची पाहणी वनविभाग सध्या करत आहे. त्याला ट्रँक्विलायझरचा वापर करून सुरक्षितपणे पकडून परत जंगलात सोडण्याची रणनीती देखील आखण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले शिवाय, छतावर अथवा खिडक्यांतून बिबट्याचे दृश्य टिपण्याचा प्रयत्न न करण्याचे देखील आवाहन पोलिसांनकडून करण्यात आले.
हे देखील वाचा – Ujjwala Thite : अनगर नगरपंचायतीत निवडणुकीच्या अर्जावरून राजकारण तापले..









