Nagpur Helicopter Plant | नागपुरात उभारणार 8,000 कोटींची हेलिकॉप्टर फॅक्टरी! हजारो जणांना रोजगाराची संधी, 2026 पासून उत्पादन सुरू

Nagpur Helicopter Plant

Nagpur Helicopter Plant | नागपूर येथे लवकरच 8,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना (Nagpur Helicopter Manufacturing Plant) उभारला जाणार आहे. मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड (Max Aerospace & Aviation Private Limited) आणि महाराष्ट्राच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला,

या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत उद्योग सचिव पी. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

प्रकल्पाचे स्वरूप आणि रोजगार संधी

या सामंजस्य करारानुसार, मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन युनिट स्थापन करेल आणि 2026 पासून याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील आठ वर्षांत ₹8,000 कोटींच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प सुमारे 2,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करेल. हा प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला असा प्रकल्प आहे, जो हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन (आणि पूर्ण-स्तरीय उत्पादन करेल.

हा प्रकल्प महाराष्ट्राला एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातीलएक प्रमुख केंद्र बनवेल. नागपूर विमानतळाजवळअसलेल्या या युनिटला सध्याच्या पायाभूत सुविधांचा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ होईल. हे युनिट रोटरी-विंग प्लॅटफॉर्मच्या कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि उड्डाण चाचणीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून काम करेल. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस सप्लाय चेनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.

या प्रकल्पामुळे नागपूर आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवीन गती मिळणार असून, देशाच्या संरक्षण क्षेत्रातही मोठे योगदान मिळेल.