Nanded News : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने महाराष्ट्र आधीच हादरला होता. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको, आंदोलने करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी देखील केली आहे. आणि आता मालेगाव पाठोपाठच नांदेडमध्ये सुद्धा अशीच एक संतापजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ७ वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेड शहरातील इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका नराधम शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना काल घडली आहे.
गुरुवारी हि लहान मुलगी शाळेत जाण्यासाठी वारंवार नकार देत होती, मुलीच्या आईने विचारपूस केली असता शिक्षकाने केलेला घाणेरडा प्रकार तिने सांगितला, त्यानंतर आज मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, या तक्रारीवरून त्या शिक्षकावर 64(2), 65(2) ,351(2) Bns , ४६८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्शवभूमीवर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार आहोत अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात मात्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पीडित चिमुकली ही शहरातील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत दुसरी वर्गात शिकत आहे. १९ नोव्हेंबरला ती नेहमी प्रमाणे शाळेतून घरी आली. दुसऱ्या दिवशी आईने नेहमी प्रमाणे तीला शाळेत जाण्यासाठी झोपेतून उठवले, पण तिने शाळेस जाण्यास स्पष्ट नकार दिला. दोन ते तीन वेळेस आई आणि वडिलांनी तिला शाळेत जाण्यास सांगितले. तरी देखील ती शाळेत नाही जाणार यावर ठाम होती. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या आईने तिला याच कारण विचारलं असता तिने ती सांगिलते त्यानंतर तिच्या आई वडिलांडी तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाणे गाठत शिक्षका विरोधात तक्रार दाखल केली. नराधम शिक्षक का शाळेत गणित विषय शिकवत होता. आत्याचार करत मुलीला धमकी दिली असा आरोप देखील आईवडिलांनी केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा –









