Nanded Politics : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग येताना दिसत आहे. खर तर ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका (Election) असलयाचे बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. अनेक जिल्ह्यात मंत्र्याच्या आणि नेत्यांच्या कुटुंबातील सदस्याला आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे चित्र आहे. नांदेड (Nanded) जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भाजपने (BJP) एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, घराणेशाहीवरून सतत आक्रमक होणाऱ्या भाजपावर आत टिकेची झोड उठत आहे.
लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, तर भाऊ सचिन सूर्यवंशी, आणि भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, आणि एवढंच न्हवे तर मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. पक्षात घराणेशाही चालणार नाही म्हणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
लोहा नगर परिषद एकूण दहा प्रभाग असून २० नगरसेवकांसाठी ही निवडणूक होतं आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी इथे अर्ज दाखल केले आहेत. भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपवर टीका होत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत आहे. चव्हाण हे भाजपात आल्यापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. लोहा नगर परिषदेसाठी अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या देखील अधिक होती,असे असताना भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने नाराजीचे सूर सध्या नांदेडमध्ये दिसत आहेत.
हे देखील वाचा – Hero Destini 110 : Activa आणि Jupiter पेक्षा उत्तम मायलेज देते ‘ही’ स्कूटर; किंमत फक्त 72 हजार रुपये









