Home / महाराष्ट्र / Naresh Mhaske : नरेश म्हस्केंची सेटिंग गेली फेल, मुलाचं तिकीट कापल, शेवटच्या दिवशी शिंदेंकडून म्हस्केंना मोठा धक्का

Naresh Mhaske : नरेश म्हस्केंची सेटिंग गेली फेल, मुलाचं तिकीट कापल, शेवटच्या दिवशी शिंदेंकडून म्हस्केंना मोठा धक्का

Naresh Mhaske : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे सर्व प्रमुख पक्षांना युती करणे, उमेदवार जाहीर...

By: Team Navakal
Naresh Mhaske
Social + WhatsApp CTA

Naresh Mhaske : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे सर्व प्रमुख पक्षांना युती करणे, उमेदवार जाहीर करणे किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गती आणावी लागल्याचे दिसून आले.

अशा शेवटच्या दिवशी अनेक पक्षांना युतीची लॉटरी लागते तर काहींना मोठा झटका बसतो. सध्या अशाच परिस्थितीत, महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना जोरदार झटका दिल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे महानगरपालिकेतील निवडणुकीसाठी नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के इच्छुक होते. पिता-पुत्रांनी या उमेदवारीसाठी पूर्ण तयारी केली होती आणि अशी चर्चा होती की नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे मुलाला सहजपणे तिकीट मिळेल. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी अचानक निर्णय घेतला आणि नरेश म्हस्के यांच्या मुलाचं तिकीट रद्द केले.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नरेश म्हस्के यांनी स्वतः आपल्या मुलगा आशुतोष म्हस्के याला तिकीट मिळावे म्हणून मोठा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. ठाण्यात इतर अनेक दिग्गज नगरसेवकांचे तिकीटही रद्द करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठा संताप उमटला आहे. बंडाची परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यातील आनंदमठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झालेल्या उमेदवारांना समजूत घालत होते. अनेक नाराज दिग्गज नगरसेवकांना त्यांनी शांत केले आणि पक्षाच्या धोरणांचा अर्थ स्पष्ट केला.

हे देखील वाचा – Air Pollution Across India : संपूर्ण भारतात वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या