Nashik Accident – नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद-मुल्हेर रस्त्यावर पिकअप वाहन (Pickup vehicle)आणि कारचा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा (labourers killed) जागीच मृत्यू झाला, तर १२ मजूर (labourers)जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ताहाराबाद (Taharabad) येथून आदिवासी भागातील मजूर शेतीकामासाठी आले होते. काम आटोपून सायंकाळी उशिरा पिकअप वाहनातून ते आपल्या गावी परतत असताना ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावर ही दुर्घटना घडली. शेतमजुरांनी भरलेल्या पिकअपला एका कारने धडक दिली. या धडकेमुळे पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
धडकेत तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. सर्व जखमींना सटाणा आणि ताहाराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हे देखील वाचा –
चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू
एलफिन्स्टन पूल पाडू देणार नाही ! स्थानिक रहिवाशांचा विरोध कायम