Nashik Crime : राज्यात ठराविक रिक्षाचालकांची मुजोरी हि काही लपून राहिलेली नाही. असेच नाशिक शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी (Nashik Police) सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेला आता दुसरा टप्पा सुरु झाला आहे. बेशिस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यास आता पोलिसांनी सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेने रस्त्यावर अराजक माजवणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
नियमांचा सर्रास भंग करणारे रिक्षाचालक शहरातील वाहतूक व्यवस्थेला धाब्यावर बसवत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी नाशिकच्या वाहतूक विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहिता कलम २८५ आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यास देखील सुरुवात केली आहे. एकाच दिवसात तब्बल १८ तासांच्या विशेष कारवाईत २० गुन्हे दाखल करण्यात आले शिवाय ६० रिक्षा देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे अनेक बेशिस्त चालकांना चांगलाच चोप बसला आहे.
नाशकात अनेक भागांत रिक्षाचालकांकडून सायंकाळी अयोग्य वर्तन, दारू पिऊन वाहन चालवणे, तसेच यामुळे नियमांचे सर्रास उल्लंघन होतो, याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी देखील येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरिधिका सी. एम. यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तपासण्या देखील सुरू केल्या. या कारवाईत सहाय्यक आयुक्त सुधाकर सुराडकर, अद्विता शिंदे, वाहतूक शाखेच्या सात युनिट्स, आणि शहरातील एकूण १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकांनी सहभाग घेतला.
ही मोहीम केवळ रिक्षाचालकांपुरती मर्यादित न्हवती तर, शहरात दहशत माजवणारे सराईत ट्रक ड्राइवर आणि टॅक्सी चालक देखील कारवाईच्या. पट्यात आले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी ६० हुन अधिक रिक्षाचालकांची आधार कार्ड माहिती नोंदवली, त्यांना कडक इशारे देत, समन्स पत्रांवर सह्या देखील घेतल्या आहेत.
हे देखील वाचा – Election Commission : विरोधकांची एकी निवडणूक आयोगाला भोवणार का?