Nashik Kumbh Mela : नाशिकचा कुंभमेळा याबद्दल अनेक पवित्र गोष्टीच आपल्या कानावर पडल्या असतील. कुंभमेळा आणि वाद फारसा काही संभंध कधी आलाच नाही. दर बारा वर्षानी नाशिकमध्ये हा पवित्र कुंभमेळा भरतो,आणि या वर्षी हा कुंभमेळा पुढील वर्षी होईल. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अश्या दोन प्रमुख ठिकाणी विभागून होतो.
आता पर्यंत कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांची निवास व्यवस्था तपोवनात केली जाते. हा परिसर म्हणजे साधूनच गाव कि काय असा प्रश्न देखील पडायचा. म्हणूनच कि काय हा परिसर कुंभमेळा कालावधीत साधुग्राम म्हणून ओळखला जातो. कुंभमेळ्यातील अमृत पर्वात स्नानासाठी साधू, महंत रामकुंडाकडे वळतात. रामकुंडापर्यंत त्यांना तपोवनातून येणेच सोयिस्कर ठरते. तपोवनापासून रामकुंडापर्यंतचे अंतरही तसे फारसे नाही. तसेच पौराणिक काळी साधू, महंतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच तपोवनाची ओळख असल्याने आधुनिक काळातही साधू, महंतांची कुंभमेळ्यात वास्तव्यासाठी तपोवनालाच पसंती दिली आहे. त्यामुळे प्रत्येक कुंभमेळ्यात तपोवनातच साधू, महंतांच्या निवासाची सोया केली जाते.
परंतु आता येणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे चार लाखांहून अधिक साधू-महंंत साधुग्राममध्ये वास्तव्यास येणार असल्याचा अंदाज आहे. अतिशय मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू महंतांची निवासी व्यवस्था करणे या वेळी कठीण असल्याचे दिसून येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू, महंतांची निवास व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील नेहमीची जागा तोकडी पडत आहे. त्यामुळे साधुग्रामचा विस्तार करावा लागणार आहे. साधुग्रामसाठी १२०० एकर जागा प्रस्तावित असून महापालिकेत्या ताब्यात असलेल्या ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारण्यासाठी १८२५ वृक्ष चिन्हांकित करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. महापालिकेने स्वत:ची ५४ एकर जागा साधुग्रामसाठी मोकळी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या आधी पवित्र अश्या कुंभमेळ्यात कधीही वृक्षतोड झालेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याच्या शक्यतेने पर्यावरणप्रेमी मात्र आक्रमक झालेले दिसत आहेत.
अर्थात, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या टोकाच्या विरोधाला आणि संतापाला अनेक करणे आहेत. तीन वर्षापासून महापालिकेता प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडवण्याला सध्या कोणीच नाही, अशी भावना आहे. व्यक्तिगत जागेतील अत्यंत अडचण म्हणून झाड तोडणे कठीण असते कारण महापालिकेचे प्रशासन इतके जेरीस आणते की भविष्यात कोणीही भीतीने झाडे लावणार नाहीत. असे असताना स्वतः महापालिका १८०० झाडे तोडणार म्हटल्यावर समाजात संताप चांगलाच वाढला आहे.
गरजेनुसार काही झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने १,८३४ झाडांवर खुणा केल्या होत्या; परंतु या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा होणार विरोध बघून महापालिकेने यातील काही झाडे वाचवता येतील का? याची चाचपणी सुरू केली आहे. साधुग्रामसाठी झाडे तोडणे महत्वाचेच मात्र, त्यातील किती वाचवता येतील, याचा विचार आता केला जात आहे.
हे देखील वाचा – Cyclone Ditwah : ‘दिटवाह’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने?









